नगर जिल्ह्याच्या विविध भागात सोसाट्याचा वारा

श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात ठिकठिकाणी हलकासा पाऊस
नगर जिल्ह्याच्या विविध भागात सोसाट्याचा वारा
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळाचे परिणाम नगर जिल्हयातही पहावयास मिळत आहे. जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी रात्रीपासूनच सोसाट्याचा वारा वाहत होता. काल रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर व परिसर पाच-सहा मिनिट जोरदार सरी बरसल्या.

हरेगाव, उंदिरगाव, माळेवाडीत जोरदार पाऊस झाला. काही काळ वाराही जोरदारपणे वाहत होता. या पावसामुळे दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

राहुरीसह तालुक्यात देवळाली. राहुरी फॅक्टरी, वांबोरी व अन्य भागातही हलकासा पाऊस झाला. सोसाट्याचा वाराही वाहत होता. भंडारदरा वार्ताहराने कळविले की, पाणलोटात सोसोट्याचा वारा वाहत आहे. काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हलकासा पाऊस झाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com