नगर जिल्ह्यात 24 तासात तब्बल 535 नव्या रुग्णांची भर
सार्वमत

नगर जिल्ह्यात 24 तासात तब्बल 535 नव्या रुग्णांची भर

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 535 ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट लॅबमध्ये 34, अँटीजेन चाचणीत 284 आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 217 रुग्णांचा समावेश आहे.

यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1795 इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज 279 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता 3639 इतकी झाली.

काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत 24 रुग्ण बाधित आढळून आले होते. बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 09 नेवासा 13, जामखेड 02 अशा 24 रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर आणखी 10 रुग्णांचा अहवाल बाधित आढळून आला. यात नेवासा 01 चांदा, अहमदनगर शहर 02, अकोले 07 शेरणखेल 04, रेडे 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 284 जण बाधित आढळुन आले. यामध्ये संगमनेर 27, राहाता 09, पाथर्डी 25, नगर ग्रामीण 15, श्रीरामपुर 12, कॅन्टोन्मेंट 13, नेवासा 20, श्रीगोंदा 60, पारनेर 17, राहुरी 06, शेवगाव 43, कोपरगाव 12, जामखेड 22 आणि कर्जत 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 217 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 175, संगमनेर 05, राहाता 13, पाथर्डी 04, नगर ग्रामीण 05, श्रीरामपूर 04, कॅन्टोन्मेंट 01, नेवासा 01, श्रीगोंदा 01, पारनेर 04, शेवगाव 02, कोपरगाव 01 आणि कर्जत येथील 01 रुग्णांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com