नगर जिल्ह्यात 24 तासात 462 रुग्णांची वाढ
सार्वमत

नगर जिल्ह्यात 24 तासात 462 रुग्णांची वाढ

उपचार सुरू असलेल्यांची संख्या 2 हजार 359, मृतांच्या संख्येत सहाने वाढ

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्गाचा आकडा कमी होण्याचे नाव घेण्यास तयार नाही. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात नव्याने 462 करोना रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 44, अँटीजेन चाचणीत 295 आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 123 रुग्णांचा समावेश आहे.

यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 359 इतकी झाली आहे. मृतांच्या सरकारी आकडेवारीत देखील सहाने वाढ करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील करोना बळींची संख्या आता 84 झाली आहे.

मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 22 रुग्ण बाधित आढळून आले. यात रुग्णामध्ये धुळे जिल्ह्यातील 1, मनपा हद्दीतील तारकपूर 1, कल्याण रोड 1, गुगळे कॉलनी 1, नगर शहर 2 असे 5 रुग्ण, भिंगार कॅन्टोन्मेंट 2 आणि पारनेर तालुक्यातील रुईछत्रपती 1 व पारनेर शहरातील 13 रुग्णाचा यात समावेश आहे.

सायंकाळी त्यानंतर पुन्हा आणखी 22 रुग्ण बाधीत आढळून आले. यामध्ये मनपा हद्दीत शहरातील 5, सारसनगर 1 असे 6 रुग्ण. पारनेर शहर 1, रांजणगाव मशीद 1, किन्ही 1 असे 3 रुग्ण, अकोले तालुक्यात शेटेमळा 5, लाडगाव 1, सुगाव खुर्द 1, उंचखडक 2, बांगरवाडा (राजूर) 2, कॅन्टोन्मेंट 1 असे 11 रुग्ण आणि नेवासा तालुक्यातील चांदा येथील 1 रुग्णाचा यात समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 295 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 28, संगमनेर 10, राहाता 2, पाथर्डी 22, नगर ग्रामीण 11, श्रीरामपूर 15, कॅन्टोन्मेंट 18, नेवासा 12, श्रीगोंदा 33, पारनेर 47, शेवगाव 30, कोपरगाव 20, जामखेड 7 आणि कर्जत 24 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 123 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 106, संगमनेर 5, राहाता 3, नगर ग्रामीण 3, नेवासा 1, शेवगाव 1, कोपरगाव 1, जामखेड 1 आणि कर्जत येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.

आणखी 340 रुग्ण करोनामुक्त

मंगळवारी 340 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा 197, संगमनेर 14, राहाता 17, पाथर्डी 27, नगर ग्रा.10, श्रीरामपूर 18, कॅन्टोन्मेंट 8, नेवासा 10, श्रीगोंदा 9,पारनेर 7, अकोले 1, राहुरी 4, शेवगाव 6 कोपरगाव 1, जामखेड 4, कर्जत 7 अशा रुग्णांचा समावेश आहे. यामुळे करोनामुक्त झालेल्याची संख्या आता 4 हजार 365 आहे.

झेडपीच्या चार अधिकार्‍यांचे अहवाल निगेटिव्ह

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या संपर्कात आलेल्या त्या चार अधिकार्‍यांचे अहवाल मंगळवारी रात्री उशीरा निगेटिव्ह आले आहेत. यामुळे या अधिकार्‍यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दरम्यान नगरच्या सावेडी भागातील एका मनपा लोकप्रतिनिधी, तिचा पती आणि मुलाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com