नगर जिल्ह्यात केला 'ऐवढा' क्विंटल कापूस खरेदी

नाशिक विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांची माहिती
नगर जिल्ह्यात केला 'ऐवढा' क्विंटल कापूस खरेदी
कापूस

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

नगर जिल्ह्यात आजपर्यंत 30 हजार 154 शेतकर्‍यांचा 5 लाख 9 हजार 734 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती नाशिक विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी दिली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ज्योती लाठकर म्हणाल्या, अहमदनगर जिल्ह्यात कापूस पणन महासंघामार्फत कोविड कालावधीपूर्वी 7 हजार 551 शेतकर्‍यांकडून 1 लाख 60 हजार 558 क्विंटल तर कोविड कालावधीनंतर 3 हजार शेतकर्‍यांकडून 87 हजार 429 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

याप्रमाणे सीसीआयच्या माध्यमातून कोविड कालावधीपूर्वी 13 हजार 173 शेतकर्‍यांकडून 1 लाख 31 हजार 321 क्विंटल तर कोविड कालावधीनंतर 908 शेतकर्‍यांकडून 15 हजार 745 क्विंटल आणि अहमदनगर बाजार समित्यांमधील अनुज्ञप्ती धारक व्यापारी यांच्यामार्फत 4 हजार 978 शेतकर्‍यांकडून 98 हजार 645 क्विंटल तर कोविड कालावधीनंतर 546 शेतकर्‍यांकडून 16 हजार 35 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 30 हजार 154 शेतकर्‍यांचा 5 लाख 9 हजार 734 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

करोना संसर्गाच्या काळात शेतकर्‍यांच्या कापसाला हमी भाव मिळण्यासाठी शासनामार्फत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत कोविड कालावधीपूर्वी 1 लाख 3 हजार 637 शेतकर्‍यांकडून 31 लाख 42 हजार 284 क्विंटल तर कोविड कालावधीनंतर 33 हजार 708 शेतकर्‍यांकडून 8 लाख 84 हजार 132 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. याप्रमाणे विभागात एकूण 1 लाख 37 हजार 345 शेतकर्‍यांकडून एकूण 40 लाख 26 हजार 417 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात 25 लाख 55 हजार 655 क्विंटल इतकी सर्वाधिक कापूस खरेदी करण्यात आली आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात 5 लाख 09 हजार 734 क्विंटल, धुळे जिल्ह्यात 4 लाख 50 हजार 23 क्विंटल, नंदूरबार जिल्ह्यात 4 लाख 44 हजार 410 क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात 66 हजार 593 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

कापूस पणन महासंघ, सी.सी.आय, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक तसेच बाजार समितीमधील अनुज्ञाप्तीधारक व्यापारी यांचेमार्फत कापूस खरेदी करण्यात येत असते. यानुसार नाशिक विभागात कापूस पणन महासंघामार्फत आजपर्यंत विभागात 41 हजार 25 शेतकर्‍यांकडून 13 लाख 10 हजार 471 क्विंटल, सीसीआयकडून 67 हजार 584 शेतकर्‍यांचा 17 लाख 53 हजार 28 क्विंटल, खाजगी बाजाराच्या माध्यमातून 18 हजार 586 शेतकर्‍यांकडून 7 लाख 12 हजार 862 क्विंटल तर बाजार समितीमधील अनुज्ञाप्तीधारक व्यापार्‍यांमार्फत 10 हजार 150 शेतकर्‍यांकडून 2 लाख 50 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

नाशिक विभागात एकूण 1 लाख 37 हजार 345 शेतकर्‍यांकडून एकूण 40 लाख 26 हजार 417 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात विभागात सर्वाधिक 25 लाख 55 हजार 655 क्विंटल खरेदी झाली. विभागात कापूस पणन महासंघामार्फत 41 हजार 25 शेतकर्‍यांकडून 13 लाख 10 हजार 471 क्विंटल खरेदी झाली तर सीसीआयच्या माध्यमातून विभागात 67 हजार 584 शेतकर्‍यांचा 17 लाख 53 हजार 28 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com