नगरमध्ये व्यावसायिकाचा तर संगमनेरात शेतकर्‍याचा मृत्यू

नगरमध्ये व्यावसायिकाचा तर संगमनेरात शेतकर्‍याचा मृत्यू

करोनाच्या पोर्टलवर चार मृत्यूची नोंद, जिल्ह्यात आणखी 72 करोना बाधित

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील करोना बाधितांच्या आकड्याने एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी दिवसभरात दोन टप्प्यांत आलेल्या अहवालानुसार आणखी 72 रुग्णांची वाढ झाली आहे. यासह करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचा आकडा चारने वाढला असून यात एक नगर शहरातील व्यावसायिक तर दुसरा संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्‍याचा समावेश आहे. तर उर्वरित जिल्ह्यातील दोघांची नोंद करोना पोर्टलवर झाली असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात सध्या 360 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील करोना टेस्ट लॅबमध्ये सोमवारी 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नगर शहरातील 15, श्रीगोंदा येथील 7 आणि पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश होता. बाधितांमध्ये पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील 1, श्रीगोंदाच्या झेंडा चौक येथील 5 तसेच श्रीगोंदा शहरातील एक आणि तालुक्यातील वडळी येथील एक जण बाधित आढळून आले. तर नगर शहरात गवळीवाडा येथील 9, चितळे रोड 1, झेंडी गेट 1, आणि शहराच्या मध्यवस्तीत 4 जण बाधित आढळून आले होते.

सायंकाळी आलेल्या अहवालात 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 43 रुग्णांची नोंद जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. जिल्हा रुग्णालयात टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 3 तर श्रीगोंदा येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. यासह खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर 11 (घुलेवाडी 2, मालदाड रोड 3, भारत नगर 1, जनतानगर 1, निमोण 2, जोर्वे रोड रहेमतनगर 1, अरगडे गल्ली 1). नगर मनपा 17 (विनायकनगर 4, शाहूनगर केडगाव 1, श्रीराम नगर 1, सुभेदार गल्ली 1, भवानीनगर 1, सावेडी 3, कावरे मळा 1, नगर शहर 5). नगर ग्रामीण 2 (पोखर्डी 1, पितळे कॉलनी, नागापूर 1), राहाता 4 (शिर्डी 1, पिंपरी निर्मळ 1, सोनगाव पठारे 1, कानकुरी 1), राहुरी 3 ( म्हैसगाव 1 तामर खेडा 1, राहुरी शहर 1), श्रीगोंदा 2 (चिखली 1, श्रीगोंदा 1), श्रीरामपूर 1 (ममदापूर), अकोले 1, भिंगार 1, पाथर्डी 1 (त्रिभुवनवाडी) यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील 649 रुग्णांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे. यात सोमवारी नगर शहर 7, श्रीरामपूर 7, राहाता, श्रीगोंदा आणि जामखेड येथील प्रत्येकी 1, अशा 15 व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 26 करोना बाधितांचा मृत्यू झाला असून यातील चौघांची नोंद आरोग्य यंत्रणेनेे सोमवारी जाहीर केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com