corona
corona
सार्वमत

जिल्ह्यात 48 बाधित; 40 करोनामुक्त

नगर, संगमनेरमध्ये करोनाचा कोप सुरूच

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात आता खर्‍याअर्थाने करोना संसर्गाचा फैलाव गुणाकार पध्दतीने होण्यास सुरूवात झाली आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात करोना संसर्गाचे 114 नव्याने रुग्ण समोर आले आहेत. यात शुक्रवारचा आकडा 48 पॉझिटिव्ह असून जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा आता 842 वर पोहचला आहे तर ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील 293 वर पोहचली आहे.

दरम्यान काल नगर मनपा हद्दीत आणि भिंगार परिसरात 18 तर संगमनेर तालुक्यात 8 नवीन करोना रुग्ण समोर आले आहेत. यामुळे याठिकाणी करोनाचे मीटर जोरात असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आणखी 40 रुग्णांंनी करोनावर मात केली. यात %ीरामपुरातील अभियंत्याच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोग शाळेत दोन टप्प्यांत आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने 48 रुग्ण समोर आले आहेत. यात पहिल्या टप्प्यात 18 तर दुसर्‍या टप्प्यात 15 यासह खासगी प्रयोग शाळेतील 15 व्यक्तींचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.

काल दुपारी पहिल्या टप्प्यात आलेल्या अहवालांत नगर महापालिका क्षेत्रातील 6, भिंगार 7, संगमनेर 1, शेवगाव 1, पारनेर 2 आणि राहाता येथील 1 रुग्ण बाधित आढळून आले. नगर महापालिका क्षेत्रातील रुग्णांमध्ये पद्मानगर येथे 3 टीव्ही सेंटर 1, फकिरवाडा 1, पाईपलाईन रोड 1 यासह भिंगार मधील गवळी वाडा येथे 7 रुग्ण. संगमनेर खुर्द येथे एक रुग्ण, शहर आणि भाळवणी येथे प्रत्येकी एक रुग्ण, शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथे आणि राहाता तालुक्यात पाथरे येथे बाधित रुग्णाचा यात समावेश आहे.

सायंकाळी जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोग शाळेतून आणखी 15 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील 3, भिंगार 2, संगमनेर 7, अकोले 1, श्रीरामपूर 1 आणि नगर ग्रामीण 1 बाधित यांचा समावेश होता.

सायंकाळाच्या अहवालात नगर महापालिका क्षेत्रात पद्मानगर येथे 1, गवळी वाडा 1, सूडके मळा येथे 1 रुग्ण आढळून आला. संगमनेर तालुक्यात कनोली येथे 4, ढोलेवाडी येथे 3 रुग्ण, अकोले तालुक्यातील देवठाण येथे एक रुग्ण, श्रीरामपूर येथे एक रुग्ण आणि नगर येथील के. के. रेंज येथे 1 रुग्ण आढळून आला असून भिंगार येथे 2 रुग्ण आढळून आले.

याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत 15 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर मनपा 8, राहाता 4, नगर ग्रामीण 2 आणि संगमनेर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यातील महापालिका क्षेत्रात माळीवाडा 1, माणिकनगर 1, नंदनवन नगर (सावेडी) 1, भिडे चौक (सावेडी)1, बिशप लॉईड कॉलनी 1, तोफखाना 1, बाग रोजा हडको 1, भिस्तबाग रोड, सावेडी 1 असे रुग्ण आढळले.

तसेच नगर ग्रामीण भागात वाघ मळा, वडगाव गुप्ता येथे 1 आणि विळद घाट येथे 1 रुग्ण, राहाता तालुक्यातील कोल्हार येथे 4 रुग्ण आढळले तर संगमनेर येथे एक रुग्णाचा यात समावेश आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 842 झाली असून करोनामुक्त झालेल्यांची संख्या 530 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 293 असून मृतांचा आकडा 20 आहे.

जिल्ह्यात आणखी 36 रुग्णांंनी करोनावर मात केली. यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 530 होऊन शुक्रवारी नगर मनपा 13, संगमनेर 14, राहाता, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर, नेवासा येथील प्रत्येकी एक, कोपरगाव 3 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

सभापती गडाख यांचा स्त्राव तपासणीला

जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख हे सोनईतील बाधितांच्या संपर्कात आलेले होते. यामुळे त्यांनी शुक्रवारी दुपारी आरोग्य विभागाला कळवून स्वत:हून करोना चाचणीसाठी स्त्राव दिला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील एक अधिकारी करोना बाधित झाला आहे. सुदैवाने हा अधिकारी करोना ड्युटीमुळे काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत आलेला नव्हता.

मात्र, आरोग्य विभागातील एक कर्मचारी या बाधिताच्या सोबत रात्रीच्यावेळी तपासणीच्या ड्युटीवर आहे. हा कर्मचारी नियमितपणे जिल्हा परिषदेत येत असून बांधकाम विभागातील अधिकार्‍याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ‘त्या’ कर्मचार्‍यांचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. सभापती गडाख आणि ‘त्या’ कर्मचार्‍याचा आज अहवाल येणार असून याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष आहे.

Deshdoot
www.deshdoot.com