कारने दोन दुचाकींना उडवले; दोन ठार, दोघे गंभीर

नगर - दौंड मार्गावर घडली घटना
कारने दोन दुचाकींना उडवले; दोन ठार, दोघे गंभीर

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

भरधाव इंडिका कारने दोन दुचाकींना उडवल्याने झालेल्या अपघातात दोन ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना अहमदनगर - दौंड मार्गावरील चिखली घटाजवळील विसापूर फाटा येथे आज सकाळी 11 वाजता घडली.

कारने दोन दुचाकींना उडवले; दोन ठार, दोघे गंभीर
नगर-मनमाड महामार्गावर ट्रक व दोन दुचाकींचा भीषण अपघात

सरिता भारत कुलकर्णी (38) आणि सचिन भीमराव काळे (40, रा. अहमदनगर) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर सुरेश साहेबराव कवडे आणि पोपट तात्याभाऊ साबळे यांच्याही दुचाकीला याच इंडिका कारने धडक दिल्याने ते जखमी झाले आहेत.

कारने दोन दुचाकींना उडवले; दोन ठार, दोघे गंभीर
रोटाव्हेटरचा चिखल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

 पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगरकडून दौंडच्या दिशेने इंडिका कार भरधाव जात होती. चिखली घटाजवळील विसापूर फाटा येथे नगरकडून श्रीगोंदयाला जाणार्‍या दुचाकींना या कारने धडक दिली. या भीषण अपघातात सरिता कुलकर्णी व भारत काळे यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.

कारने दोन दुचाकींना उडवले; दोन ठार, दोघे गंभीर
नेवाशाचे संत ज्ञानेश्वर मंदिर लखलखले

सरिता व भारत हे दोघेही अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेच्या स्नेहदीप रुग्णसेवा केंद्रात व्यवस्थापक म्हणून काम करत होते. बेलवंडी पोलीस ठाण्यास माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मच्छीन्द्र खाडे, पीएसआय  चाटे, पो. हे. कॉ. नंदू पठारे, पो. कॉ. भांडवलकर यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी भेट देऊन पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

कारने दोन दुचाकींना उडवले; दोन ठार, दोघे गंभीर
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या अडचणीत वाढ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com