नगरकरांसाठी लसीचे मिळणार अवघे 16 हजार डोस

एका दिवसाचा साठा : आता करोना लसीसाठी होणार फरफट
नगरकरांसाठी लसीचे मिळणार अवघे 16 हजार डोस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 93 हजार जणांचे करोना लसीकरण झाले असून गेल्या आठवड्यात बुधवारी जिल्ह्यासाठी 25 हजार डोस आले होते.

त्यानंतर रविवारी रात्री उशीरापर्यंत 16 हजार डोस जिल्ह्यासाठी मिळणार होते. मिळणार्‍या लशींचा साठा हा अवघ्या एक दिवसाचा असून मंगळवारपर्यंत नव्याने लसींचा साठा न आल्यास लसीकरण ठप्प होण्याची शक्यता आहे. यामुळे आता नगरकरांची लसीकरणासाठी फरफट होण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य (शासकीय, खासगी आणि महिला बालकल्याण विभाग) यातील 41 हजार 167, महसूल विभाग 1 हजार 927, पोलीस 4 हजार 781, पंचायत राज 4 हजार 643, गृह व शहरी कामकाज 2 हजार 335, रेल्वे सुरक्षा विभाग 417 आणि ज्येष्ठ नागरिक 2 लाख 37 हजार 889 जणांचे करोनाचे लसीकरण झालेले आहे.

मात्र, गेल्या 15 दिवसांपासून लसीकरणासाठी आवश्यक असणार्‍या लसीच्या पुरवठ्या घट झाली आहे. गेल्या आठवड्यात 3 लाख लसींची मागणी नोंदविण्यात आली होती. प्रत्यक्षात अवघी 25 हजार लस उपलब्ध झाली. त्या रविवारपर्यंत कसेतरी लसीकरण करण्यात आले आहे. आज सोमवारी लसीकरण बंद राहणार असून रविवारी रात्री उशीरा 16 हजार लस जिल्ह्यात दाखल होणार असून त्याचे वाटप आज केल्यानंतर मंगळवारी लसीकरण सुरू होणार आहे.

मात्र, जिल्ह्यात 165 केंद्रावर एकाच दिवशी लसीकरणासाठी 15 हजारांच्या जवळपास लसची आवश्यकता असल्याने येणारी लस ही अवघी एकाच दिवस पुरणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com