नगर शहराच्या पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक कोलमडलं

नगर शहराच्या पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक कोलमडलं

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहराचा पाणी पुरवठाही तौक्ते वादळामुळे विस्कळीत झाला आहे. मुळानगर येथील वीज पुरवठा दुपारपासून बंद झाल्याने धरणातून पाणी उपसा झाला नाही.

परिणामी साठवण टाक्या भरल्या नाहीत. त्यामुळे नगरकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. काही मिनिटे लाईट गेली तरी मुळानगर,विळद आणि नागापूर येथील पंपिंग स्टेशन पूर्वपदावर येण्यास दोन-तीन तासाचा अवधी लागतो.

सायंकाळी उशिरापर्यंत मुळानगर येथील वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com