नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर पाणीपुरवठा योजनेवरील (City Water Supply Scheme) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (State Electricity Distribution Company) होणार्‍या वीज पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड (Technical Failure) झाला आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत (Water Supply Disrupted) राहणार आहे.

मुळानगर (Mulanagar), विळद (Vilad) व नागापूर (Nagapur) येथील कार्यरत पंपिग स्टेशन (Pumping station) येथून पाणी उपसा सुरळीत होण्यास दोन ते तीन तासाचा अवधी लागतो. त्यामुळे अनियमीत पाणी उपसा होवून शहरातील वितरणासाठीच्या टाक्या वेळेत भरता येत नाहीत. पर्यायाने शहरास नियमीत व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागाचा मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरतीचौक, माळीवाडा, कोठी या भागासह सर्व उपनगरास सोमवारी उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, नालेगाव, माळीवाडा (काही भाग), चितळे रोड, कापडबाजार, माणिक चौक, नवीपेठ, तोफखाना, आनंदी बाजार तसेच सावेडी, बालिकाश्रम रोड परिसर इत्यादी भागास पाणीपुरवठा मंगळवारी होणार नसून तो बुधवारी होईल.

Related Stories

No stories found.