नगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत

नगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-मनमाड महामार्ग (Nagar-Manmad Highway) दुरूस्तीचे काम विळद (Vilad) (ता. नगर) येथे सुरू असताना सोमवारी दुपारी नगर शहराला पाणीपुरवठा (Water supply) करणारी जलवाहिनी फुटली. ( Water Pipe Burst ) त्यामुळे शहर वितरणासाठीच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य न झाल्यामुळे नगरचा पाणीपुरवठा विस्कळीत (Water supply Disrupted) झाला आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत (Municipal Corporation) तातडीने सुरू करण्यात आलेले आहे.

सोमवारी उपनगर भागाचे नियोजीत पाणी वाटप बंद राहिल्याने त्यांना आज मंगळवार नेहमीच्या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच मंगळवार, बुधवारी रोटेशननुसार शहराच्या मध्यवर्ती भागास एक दिवस उशिराने पाणी वाटप होणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महानगरपालिकेने (Municipal Corporation) केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com