तिसर्‍या दिवशी नगरमध्ये लसीकरण ठप्प

दोन दिवसांपासून लसचा पुरवठा बंद : नागरिक त्रस्त
तिसर्‍या दिवशी नगरमध्ये लसीकरण ठप्प

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात (Nagar city) सलग तिसर्‍या दिवशी लसीकरण बंद (Vaccination stopped on the third day) राहिल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. लस मिळावी म्हणून रोज प्रतिक्षा करणार्‍यांना लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) गेल्यावर लसीकरण बंद (Vaccination close) सल्याचे समजत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे (Health Department of Zilla Parishad) चौकशी केली असता दोन दिवसांपासून सरकारकडून लसींचा पुरवठा झालेला नसल्याचे सांगण्यात आले.

केंद्र सरकारकडून (Central Government) राज्य सरकारकडे (State Government) आणि राज्य सरकारकडून जिल्हानिहाय लसींचे वाटप केले जाते. जिल्ह्यात लसींचा पुरवठा (Supply of vaccines in the district) जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत (Under Health Department of Zilla Parishad) लसच्या डोसचा पुरवठा करण्यात येतो. शहरात तीन दिवसांपासून सायंकाळनंतर लसबाबत मनपा आरोग्य विभागशी (Ahmednagar Municipal Corporation Health Department) संपर्क साधल्यानंतर लस उपलब्ध नसल्याचे समजते. त्यानंतर उद्या लसीकरण बंद असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकही हवालदील झाले आहेत.

केंद्र सरकारकडून 21 जुलैपासून सर्वत्र लसीकरणाने वेग घेतल्याचे जाहीर केले जात आहे. राज्यातही सरकारकडून तेच सांगण्यात येते. सर्वाधिक लसीकरण राज्यात झाल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, हा दावा करतानाच दुसरीकडे केंद्र सरकारकडून लसींचा साठा मुबलक उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीही केल्या जात आहे. एकीकडे ज्येष्ठ व आजारी नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम सुरू करण्याचेही सांगितले जात आहे. मात्र, लस उपलब्ध होत नसल्याने सरकारच्या घोषणा पोकळ ठरत असल्याचे चित्र आहे.

लसीकरण सुरू की बंद राहणार. कोणत्या दिवशी कोणती लस मिळणार, कोणत्या वयोगटाचे लसीकरण करण्यात येणार याची माहिती आदल्या दिवशी लवकर मिळाल्यास ज्येष्ठ नागरिकांचा लसीकरण केंद्रावरील हेलपाटा वाचेल, अशी मागणी होत आहे. महापालिकेत या संदर्भात चौकशी केली असता जिल्हा लसीकरण कार्यालयाकडून सायंकाळी उशीरा लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर महापालिकेकडून सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली जाते, असे सांगण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com