अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र शासनाने शहरातील भुरारी गटारी योजनेसाठी अमृत योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.

हे काम प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे शहराजवळील सर्व उपनगरांमध्ये भुयारी गटारीसाठी केंद्र शासनाकडून लवकरच मोठा निधी प्राप्त होणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. केडगाव उपनगरातील विकास कामाचा शुभारंभ महापौर वाकळे यांच्याहस्ते झाला.

यावेळी मनपा स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, नगरसेविका गौरी नन्नवरे, नगरसेवक राहुल कांबळे, गणेश नन्नवरे उपस्थित होते. यावेळी सभापती कोतकर म्हणाले, केडगाव उपनगराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. भविष्यात राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पाण्याची टाकी व इतर नागरी सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.