अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

बेशिस्त वाहन चालकाविरुद्ध शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणारे,

वाहतूक नियमभंग करणारे चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबून नगर शहरात दुचाकीवरून ट्रिपल सीट बसून दुचाकी चालविणाऱ्या 136 दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच वाहतूक नियमभंग करणारे एकूण 567 वाहनचालकां विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

ट्रिपल सीट बसून दुचाकी चालविणारे वाहनचालकांविरुद्ध कारवाईची विशेष मोहीम पुढील 5 दिवस सुरू राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी सांगितले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शहर पोलीस उपाअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.