नगर शहरात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन

10 मेपर्यंत 'या' सेवा वगळता सर्व आस्थापना बंद
नगर शहरात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन

अहमदनगर|प्रतिनिधी |Ahmedagar

शहरात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आज शहरात 817 रुग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने करोना संक्रमण वाढत आहे. यामुळे प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू असणाऱ्या आस्थापना उद्या रात्री 12 पासून 10 मे च्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.

सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. वैद्यकीय सेवा सुरू असणार आहे. दूध सकळी 7 ते 11 पर्यत विक्री चालू राहणार आहे. किराणा विक्री व भाजीपाला विक्री बंद राहणार आहे. शेतकऱ्यांनी नगर शहरामध्ये आपला शेतीमाल विक्रीत आणू नये अन्यथा मनपाच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहराचे आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, शहर उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी शहरातील माळीवाडा परिसरात पाहणी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com