सोशलवार नंतर रस्त्याची डागडूजी

सोशलवार नंतर रस्त्याची डागडूजी

शहरातील रस्त्यावरून मनपा टार्गेट

अहमदनगर|Ahmedagar

शहरातील रामचंद्र खुंट (Ramchandra Khunt) ते डावरेगल्ली (Davare Galli) या रस्त्यावर पडलेल्या खड्डांचा (Pits) व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल (Vedio Social Media Viral) झाल्यानंतर महापालिकेला (Municipal Corporation) जाग आली. मनपाने रविवारी या रस्त्यावर मुरूम, खडी टाकून डागडूजी केली.

दरवर्षी पावसाळ्यात नगरमधील रस्त्यांची (Nagar City Road Problem) वाट लागते. यंदाही पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून नगरकरांना यातून वाट काढत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिकेकडून (Municipal Corporation) करण्यात आलेल्या फेज- 2 (Phase-2), अमृत भुयारी गटार योजनेमुळे (Amrut underground sewerage scheme) ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यावर मातीचा थर साचला असून रिपरिप पावसामुळे दलदल झाली आहे.

रस्त्याच्या खड्ड्यावरून सोशल मिडीयावर महापालिकेला टार्गेट (Target the corporation on social media) करण्यात आले आहे. शहरातील रामचंद्र खुंट (Ramchandra Khunt) ते डावरेगल्ली (Davare Galli) या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. काही जागृत नागरिकांनी या खड्ड्यांचा व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर व्हायरल केला. व्हायरल झालेल्या व्हिडीओची मनपाने दखल घेतली. रविवारी मनपाकडून या रस्त्यावर मुरूम, खडी टाकून तात्पुरती डागडूजी करण्यात आली आहे. डागडूजी केल्याचे फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com