नगर शहरातील रस्त्यांची लागली वाट

महापालिकेचे दुर्लक्ष : नागरिक त्रस्त, धुळीमुळे श्वसनाच्या आजारांना निमंत्रण
नगर शहरातील रस्त्यांची लागली वाट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खड्ड्यांचे शहर म्हणून नगर शहराची ओळख निर्माण झाली आहे. शहरातील बहुतांशी रस्त्यांची स्थिती वाईट असून महापालिकेने

रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. खड्डे पडलेल्या या रस्त्यावर दिवसभर असणार्‍या वाहनांच्या वर्दळीमुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगर शहराचा विकास झालेला नाही. जुन्या शहरात आजही रस्ते अरूंद आणि त्यावर अतिक्रमणे आहेत. त्या तुलनेत शहराच्या उपनगराचा विस्तार मोठा असून त्याठिकाणी रस्ते मोठे असले तरी त्यांची कामे झालेली नाहीत.

उपनगरात दूरपर्यंत मानवी वस्त्या तयार होत असून त्याठिकाणी जाण्यासाठी कच्चे रस्ते आहेत. मात्र, जुन्या शहरातील रस्त्यांची स्थिती वाईट झालेली आहे. याठिकाणी रस्त्यांची कामे झाल्यावर मनपाला त्याठिकाणी पाईपलाईन, केबल आणि अन्य कामे सुचत आहेत. यामुळे एकदा तयार झालेला रस्ता पुन्हा खोदण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत.

सध्या सर्जेपुरा याठिकाणाहून अप्पू चौकाकडे जाणार्‍या रस्त्यांच्या दुरूस्तीचे गेल्या काही दिवसांपासून सुरू असून ते संपण्याचे नावच घेताना दिसत नाही. याठिकाणी दीड ते दोन फूट रस्ता खोदण्यात आलेला असून त्याठिकाणी मोठी कसरत करत नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. याच रस्त्यावर एटी महामंडळाचे वर्कशॉप असून यामुळे मोठ्या वाहनांची वर्दळ याठिकाणी असते. यामुळे या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

मुरुमाव्दारे पॅचिंग

शहरात पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांचे मुरुमाव्दारे पॅचिंग करण्यात येत आहे. याठिकाणी कायम स्वरूपातील रस्त्यांची कामे होणे आवश्यक असताना मनपा तात्पुत्या स्वरूपात कामे करत आहेत. यामुळे थोड्याच दिवसांत रस्त्यांची अवस्था वाईट होणार आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नगरकर त्रस्त झाले असून या त्रासातून कधी सुटका होणार, अशी विचारणा करताना नगरकर दिसत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com