नगरच्या खड्ड्यांना अखेर ठिगळ

अमृत भुयारी गटार योजनेच्या कामाला ब्रेक
नगरच्या खड्ड्यांना अखेर ठिगळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील (Ahmednagar City) चाळणी झालेल्या रस्त्यांवर अखरे डांबराचे ठिगळ (Asphalt Paching) लावण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे काही प्रमाणात नगरकरांना दिलासा मिळणार आहे. मात्र, यासाठी पावसाळा संपेपर्यंत केंद्र सरकारच्या अमृत भुयारी गटार योजनेच्या कामाला ब्रेक (Central Government Amrut Bhuyari Gatar Yojana Work Break) लागणार आहे.

शहरांमध्ये केंद्र शासनाची अमृत भुयारी गटार योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. मध्यवर्ती शहरामध्ये विविध ठिकाणी पाईप टाकण्यासाठी खोदकाम झाले आहे. त्यामुळे खोदकाम झाल्यानंतर ती माती रस्त्यावर टाकली जाते. पावसाच्या पाण्यामुळे चिखल होऊन रस्त्यावर छोटेमोठे अपघात होतात. नागरिकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते, याचबरोबर भुयारी गटार योजनेचे काम जेसीबी यंत्राच्या साहयाने केल्यामुळे मध्यवर्ती शहरांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत.

अमृत भुयारी गटार योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत थांबविण्याच्या सूचना उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिल्या होत्या. त्यानूसार शनिवारपासून ज्या-ज्या ठिकाणी गटार योजनेसाठी खोदकाम केले आहे, त्या-त्या ठिकाणी खड्डे बुजवणे व पॅचिगंचे काम सुरु केले आहेत. जोपर्यंत खोदकाम केलेले पॅचिगंचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत पुढील उर्वरित काम न करण्याच्या सूचना आयुक्त गोरे यांना दिल्या होत्या. त्यानुसार शनिवारी शहरात ठीक-ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com