नगर शहरात वादळी वार्‍यासह रिमझिम पाऊस

नगर शहरात वादळी वार्‍यासह रिमझिम पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरासह उपनगरात बुधवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. दिवसभर वातावरणात उकडा जाणवत होता. सायंकाळी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसाचा जोर कमी असला तरी वार्‍याचा वेग जास्त होता.

नगर शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील केडगाव, सावेडी, बोल्हेगाव, नागापूर एमआयडीसीत कुठे जोरात तर कुठे रिमझिम पाऊस पडला. सुरूवातील आकाशात ढगाळ वातावरण तयार झाले. यानंतर वादळी वार्‍याला सुरूवात झाली. नगरमध्ये वार्‍याचा वेग जास्त होता. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नगरकरांना पावसाच्या सरीमुळे दिलासा मिळाला.

वादळी वार्‍यामुळे शहरातील रस्त्यांवरील पथदिवे बंद झाले होते. शहरातील काही भागातील लाईट देखील गेली होती. काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्या होत्या. त्यामुळे वीजप्रवाह वांरवार खंडित झाला.पावसाने सायंकाळी सहा वाजल्यापासून हजेरी लावली होती. सुमारे दोन तास मेघगर्जना होत होत्या. पावसामुळे थंड वारे वाहत होते.

तालुक्यात वादळी वार्‍याचा तडाखा

नगर तालुक्यातील बहुतांशी गावात सध्या कांदा काढणीची कामे सुरू आहेत. मात्र वादळी वार्‍यांसह रोजच पडणार्‍या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची चिंता वाढवली आहे. काढणी केलेल्या कांदा पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाचा अंदाज दिसल्यास कांदा झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धांदल उडताना दिसत आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केलेली आहे. मात्र वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने रंग दाखवायला सुरुवात केल्याने शेतकर्‍यांची धांदल उडाली आहे. तालुक्यात सर्वच भागात कांदा काढणीचे काम सुरू आहे . काढलेला कांदा गोळा करून शेतातच ठेवलेला आहे. वादळी वारे व अवकाळी पावसाचा अंदाज दिसला की कांदा झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ होताना दिसत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com