मुसळधार पावसाने नगरला झोडपले

मुसळधार पावसाने नगरला झोडपले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरला मंगळवारी सायंकाळी दोन तासाहून अधिक काळ मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नगर शहरात सखल भागात पाणी साठले होते. तर ग्रामीण भागात जाणारी वाहने, एसटी बसेस अडकून पडल्या होत्या. पावसामुळे वीज गायब झाली होती.

मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान नगर आणि उपनगर, तसेच नगर तालुक्यात मुसळधार सुरूवात झाली. सुरूवातीला ढगांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. साधारण दोन तासांनंतर मुसळधार पावसाचे संततधार पावसात रुपांतर झाले. नगर-वांबोरी रोडवर डोंगरगणच्या ओढ्याला पाणी आल्याने दोन तासाहून अधिक काळ एसटीसह अन्य खासगी वाहतूक खोळंबली होती. आधीच वांबोरीला जाणार्‍या एसटी बसेसची बोंबाबोंब असल्याने महाविद्यालयात जाणार्‍या मुलीचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. डोंगरगण जवळ अडकलेल्या एसटीमध्ये वांबोरी आणि डोंगरगणमधिल विद्यार्थी अडकून पडले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com