नगर शहरासाठी जम्बो कोविड सेंटरचा प्रस्ताव

मनपात आयुक्त- काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक
नगर शहरासाठी जम्बो कोविड सेंटरचा प्रस्ताव
Covid center (File Photo)

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील करोना रूग्णांसाठी एक हजार बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मनपा सभागृहाला सादर करणार असल्याचे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी काँग्रेस पदाधिकार्यांना सांगितले.

महापालिकेच्या वतीने शहरात एक हजार बेडचे एकाच ठिकाणी जम्बो कोविड सेंटर सुरू करावे, अशी शहर काँग्रेसची मागणी आहे. याबाबत शहर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्त गोरे यांची भेट घेऊन कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, क्रीडा सचिव मच्छिंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.

नगर शहरात करोनाचे रूग्ण वाढत आहेत. रूग्णांना एकाच ठिकाणी आरोग्य सुविधा पुरविण्याची गरज आहे. त्यासाठी मनपाने वेगवेगळ्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू न करता एकाच ठिकाणी एक हजार बेडचे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी आयुक्त गोरे यांच्याकडे केली. कोविड सेंटरचा प्रस्ताव सभागृहाला सादर केला जाईल, असे आयुक्त गोरे यांनी सांगितले. तर प्रस्ताव सादर केल्यास त्यास तातडीने मंजूरी देण्याचे आश्वसन महापौर वाकळे यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com