नगरात भैय्यासाहेब पॉझिटिव्ह
सार्वमत

नगरात भैय्यासाहेब पॉझिटिव्ह

पत्नीही अ‍ॅडमिट । फॅमिलीतील दोघे क्वारंटाईन

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

नगर शहरातील एका राजकीय पक्षाच्या भैय्यासाहेबाला अस्वस्थ वाटू लागल्याने सोमवारी रात्री खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. करोना टेस्टींगसाठी त्यांचा स्वॅब घेतला असून तो पॉझिटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सामान्य नगरकरांसोबतच महापालिका, पोलीस अन् सिव्हील हॉस्पिटलसह कलेक्टर ऑफिसमध्येही करोनाने शिरकाव केला आहे. राजकीय नेत्यांपासून करोना मात्र दर होता. आता या निमित्ताने करोनाने राजकीय नेत्यालाही घेरले असल्याचे दिसते. एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याला अस्वस्थ वाटू लागल्याने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी तातडीने त्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना निमोनियाची लक्षणे दिसत असल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान कोरोना टेस्टींगसाठी त्यांचा स्वॅब घेतला असून त्याचा रिपोर्ट अजून येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.

करोना लॉकडाऊन काळात शहरातील नेतेमंडळी मदतीसाठी सगळीकडे फिरले. कोणालाच काही झाले नव्हते. आता मात्र त्यांना करोनाने घेरल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. तोपर्यंत नगरकरांना त्याची उत्सुकता लागून आहे.

या नेत्याची फॅमिलीही आज मंगळवारी सकाळी खासगी हॉस्पिटलमध्ये पोहचली. त्यांचेही स्वॅब घेण्यात आले. त्यांची लक्षणे अतिसौम्य असल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, साहेबांच्या पत्नीला हॉस्पिटल प्रशासनाने अ‍ॅडमिट करून घेतले आहे. त्यांना सौम्य लक्षणे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com