नगर शहरात 'बॉस' पॉझिटिव्ह

आजी-माजी नगरसेवकांनाही करोनाची लागण
नगर शहरात 'बॉस' पॉझिटिव्ह

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वेगाने फैलावत चालला आहे. यातच नगर शहरात ‘बॉस’ म्हणून परिचित असलेल्या

एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह आजी आणि माजी नगरसेवकांनाही करोनाची बाधा झाली आहे.

नगर शहरात रोज शंभराच्या पटीत करोनाबाधितांची भर पडत आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा आठ हजाराच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. बाधितांसोबतच ठणठणीत होणार्‍यांचे प्रमाणही त्याच पटीत वाढले आहे.

मृत्यूचे प्रमाण नगण्य (1.27) असले तरी प्रतिष्ठीत अन् तरुणांच्या बळीने शहरात चिंता वर्तविली जात आहे. स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक असलेल्या ‘बॉस’ नेत्यालाही करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबत पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह निघाला. सारसनगर परिसरातील एक ज्येष्ठ नगरसेवक आणि सावेडी परिसरातील एका माजी नगरसेविकेच्या मुलाला करोनाची बाधा झाली आहे.

या तिघांवरही खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. काल जिल्ह्यातील शिवसेना खासदारांना करोनाची बाधा झाली होती. त्या पाठोपाठ आज जिल्ह्यातील ‘बॉस’ नेत्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एमआयडीसीतील कंपनीतही करोना

नगर एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीतील कामगारांनाही करोनाची लागन झाली आहे. या कंपनीत पाच कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट लॅबमधून निघाला आहे. त्यांच्या संपर्कातील पाच जण मात्र निगेटिव्ह आहेत.

विनायकनगर, भोसले आखाडा, भवानीनगर...

बुरूडगाव रोड आणि विनायकनगर परिसरातही करोनाचे पेशंट आढळून आले आहेत. विनायकनगरमधील एकाच फॅमिलीतील तिघे बाधित निघाले आहेत. आई आणि त्यांची दोन मुलांना करोनाची बाधा झाली आहे. भोसले आखाडा परिसरातही पती-पत्नीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. समता चौकातील एकाच फॅमिलीतील चौघांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. विनायकनगर, सारसनगर, बुरूडगाव रोड येथेही करोनाबाधित आढळून आले आहेत.

भूषणनगरला सिक्सर, कोर्ट गल्लीत पंचक

भूषणनगर परिसरातील कोरोनाचा सिक्सर मारला आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधित निघालेल्या या परिवाराचा नगर बाजारपेठेशी कायमचा संबंध आहे. गंजबाजारातही कोरोनाचे पेशंट आढळून आले आहेत. केडगावात एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा झाली. कोर्ट गल्लीतही पाच संशयितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यातील चौघे एकाच कुटुंबातील असून एक मात्र स्वतंत्र कुटुंबातील आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com