कोल्हार : जुगार अड्डयावर नगर पोलिसांचा छापा

44 लाखांचा मुद्देमाल जप्त; 41 जुगारीवर गुन्हा
कोल्हार : जुगार अड्डयावर नगर पोलिसांचा छापा

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

लोणी पोलीस ठाणे हद्दीत कोल्हार बुद्रूक (ता. राहाता) येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री छापा टाकला. या छाप्यादरम्यान रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी व चारचाकी वाहनासह एकूण 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार खेळणार्‍या 41 व्यक्तीविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हार बुद्रूक येथे कोल्हार ते लोणी जाणारे रोडचे कडेला मुदस्सर शकील शेख (रा. कोल्हार बुद्रूक ता. राहाता) हा कय्युम करीम शेख याचे इमारतीचे टेरेसवर 25 ते 30 लोकांना एकत्र जमवून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवीत आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना मिळाली. त्यांनी सदरची माहीती परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी, आयुष नोपाणी, तसेच पोनि दिलीप पवार यांना कळवून पुढील कार्यवाही बाबत आदेश दिले. पथकाने रात्री आठ वाजता कय्यूम करीम शेख याचे इमारतीचे टेरेसवर छापा टाकला. यावेळी 35 ते 40 इसम पाच वेगवेगळ्या ठिकाणी गोलाकार बसून हातामध्ये पत्ते घेवून तिरट जुगार खेळत असताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.        

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com