'फेज टू'च्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार

चौकशी करण्याची लोढांची ना. तनपुरेंकडे मागणी
'फेज टू'च्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या 12 वर्षापासून नगर शहरातील (Nagar city) फेज टू पाणी योजना (Phase 2 Water Scheme) प्रलंबित आहे. चुकीच्या पद्धतीने कामाचा ठेका दिल्या गेल्यापासून या योजनेचा बट्याबोळ झाला आहे. या कामात शहराचे लोकप्रतिनिधी, मनपाचे अधिकारी, कार्यकर्ते व ठेकेदाराने संगनमताने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) केला आहे, असा आरोप करत या कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State for Urban Development Prajakt Tanpure) यांच्याकडे केली.

'फेज टू'च्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार
गडाख, पाडवींच्या विरोधात अपक्ष आमदार संतप्त

नगर शहराचा पाण्याचा प्रश्न (Nagar City Water Problem) सुटण्यासाठी राबवण्यात आलेल्या फेज 2 पाणी योजनेत मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप करत वसंत लोढा (Vasant Lodha) यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे (Minister Prajakt Tanpure) यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे उपस्थित होते.

'फेज टू'च्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार
एकाच कामाचे दोन वेळा टेंडर ; पालिकेचा अजब कारभार

फेज 2 पाणी योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी नगरविकास विभागाकडे ते निवेदन पाठवले आहे. आपण नगरविकासमंत्री मंत्री असल्यने या प्रश्नात लक्ष घालावे, अशी विंनती लोढा यांनी मंत्री तनपुरे यांना केली. यावेळी मंत्री तनपुरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवेदनाची दखल घेतली.

'फेज टू'च्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार
55 वर्षीय व्यक्तीचे अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com