नगरमध्ये आता वाहनांना रात्री सहा तास प्रवेश बंदी

उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक वळविणार
नगरमध्ये आता वाहनांना रात्री सहा तास प्रवेश बंदी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी (Flyover work) 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत रात्री 12 ते सकाळी सहा यावेळेत सर्व वाहनांना नगर शहरात प्रवेश बंद (Nagar City Entry Close) करण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले (City Traffic Branch Police Inspector Rajendra Bhosale) यांनी दिली.

नगर शहरातील सक्कर चौक (Sakkar Chowk) ते जीपीओ चौक (GPO Chowk) या दरम्यान उड्डापुलाचे काम (Flyover work) प्रगतीपथावर असून त्या अनुषंगाने सक्कर चौक (Sakkar Chowk) ते चांदणी चौका (Chandani Chowk) दरम्यान लाँचिंग गर्डरचे काम करायचे आहे. उड्डाणपुलाच्या वाहतुकीमध्ये बदल (Changes in transportation) करण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला होता. हे काम चालू असताना अपघात (Accident) होण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद करून मार्गात बदल करण्यात येणार आहे. नगरकडून पुण्याकडे (Nagar Pune) जाणारी सर्व अवजड वाहतूक शेंडी बायपास (Shendi Bypass)-शासकीय दूध डेअरी चौक (Government Milk Dairy Chowk) -विळद बायपास (Vilad Bypass)-निंबळक बायपास (Nimbalak Bypass) -कांदा मार्केट रोड (Onion Market Road) -केडगाव बायपास (Kedgav ByPass) मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून मनमाड (Pune Manmad), औरंगाबादकडे (Aurangabad) जाणारी वाहतूक केडगाव बायपास (Kedgav Bypass)- निंबळक-विळद-शासकिय दूध डेअरी चौक-शेंडी बायपासमार्गे वळविण्यात येणार आहे. बीड, जामखेड, पाथर्डीकडे जाणारे-येणारी अवजड वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे.

पुण्याकडून येणार्‍या वाहनांकरिता केडगाव बायपास-अरणगाव-वाळुंज-मुठ्ठी चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. पुणे, नगर, औरंगाबाद या मार्गावरील हलक्या वाहनांसाठी मार्ग बदलला आहे. यामध्ये सक्कर चौक-आनंदऋषीजी हॉस्पीटल-महात्मा फुले चौक-कोठी आणि सक्कर चौक येथून टिळक रोड-आयुर्वेद कॉलेज कॉर्नर-नेप्ती नाका-दिल्लीगेट-अप्पू हत्ती चौक-पत्रकार चौक-एसपीओ चौक मार्गे वळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अवजड वाहतूक शहरातून जाऊ नये म्हणून हॉटेल यश पॅलेस, कोठी चौक, नेप्तीनाका येथे दिल्ली गेटकडे येणारे रोडवर व पत्रकार चौक येथे अप्पू हत्ती चौकाकडे जाणारे रोडवर फक्त दुचाकी व हलकी वाहने जातील इतक्या उंचीचे हाईट बॅरीअर बसविण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com