नगर सिटीतील फळ, भाजीपाला मार्केट बंद

नगर सिटीतील फळ, भाजीपाला मार्केट बंद

आयुक्तांचे आदेश । नेप्ती उपआवारात नियमानुसार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात शिथील केलेले निर्बंध अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) ठोक व्यावसायिक दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेत्यांना लागू राहणार नाहीत.

मार्केट यार्डातील ही दुकाने 1 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी आज काढले. बाजार समितीच्या नेप्ती उपआवारात भाजीपाला, फळांचा बाजार सुरू असणार आहे.

आयुक्त गोरे यांनी आजपासून नगर शहरातील किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेत्यांना सकाळी 9 ते 11 वेळेत विक्रीला परवानगी दिली आहे. हे आदेश मार्केट यार्डातील दुकानांना लागू होणार नाहीत. 1 जून पर्यंत मार्केट यार्डातील ठोक व्यावसायिकांची दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेत्यांचे दुकाने बंद ठेवण्यात यावी असे आयुक्तांनी आज शनिवारी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

नगर विभागाचे प्रांतांनी 1 मे रोजी काढलेल्या आदेशानुसार नेप्ती उपआवारात मात्र परवानगी असणार आहे. प्रांताधिकार्‍यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करावी असे आदेशात म्हटले आहे.

3 मेपासून शहरात लागू केलेला कडक लॉकडाऊन आयुक्तांनी आज शनिवारपासून अशंत शिथील केला आहे. 15 ते 24 मे या काळात शहरातील किराणा दुकाने, डेअरी आणि मटन, चिकन दुकाने 11 वाजेपर्यंत सुरू करण्याला परवानगी दिली आहे. या आदेशातून नगर शहरातील मार्केट यार्डातील दुकानांना वगळण्यात आले आहे.

मार्केट यार्डात सकाळी भाजीपाला व फळ खरेदीसाठी मोठी गर्दी होते. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता बाजार समितीच्या आवारातील ठोक व्यावसायिकांची दुकाने तसेच भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत.

सोमवारपासून कांदा मार्केट

आवकाळी पावसामुळे सोमवारपासून नगर बाजार समितीच्या उपआवारात कांदा मार्केट सुरू केले जाणार आहे. नगर शहरातील आवारात चिंचेची खरेदी-विक्री केली जाणार आहे. भुसारमालासंबंधी कोणताही नवीन आदेश नसल्याने ते नेहमीप्रमाणेच सुरू राहिल, अशी माहिती बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com