उड्डाणपुल
उड्डाणपुल

उड्डाणपुलाचा कॉलम ऑगस्टमध्ये

खा. सुजय विखे । भूमिपूजन न करता थेट लोकार्पण सोहळाच करू

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

सर्व प्रशासकीय प्रशासकीय कामकाज पूर्ण झाले आहे. पुढच्या म्हणजेच ऑगस्ट महिन्यात उड्डाणपुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. दरम्यान सरंक्षण खाते, भिंगार कॅन्टोमेंट बोर्डच्या भूसंपादनाची रक्कम उद्या तातडीने वर्ग करण्यात येणार असून उड्डाणपुलाच्या कामाचे भूमीपूजन न करता थेट लोकार्पण सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी दिली.

शहर विकासासाठी आम्ही एकमेकांना नेहमीच सहकार्य करीत असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. उड्डाणपुलाचा कामाच्या माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉ. विखे बोलत होते. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, नगरसेवक महेंद्र गंधे, गणेश भोसले, निखिल वारे, प्रातांधिकारी श्रीनिवास अर्जुन, नॅशनल हायवेचे अधिकारी दिवान, माजी नगरसेवक धनंजय जाधव, बाळासाहेब पवार, निखिल वारे यांच्यासह नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, उड्डाणपुलाच्या कामाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. मात्र काही अंशी भूसंपादनाचे काम बाकी आहे. भूसंपाद राहिलेले लोक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले तर कोर्टातून त्यावर सरकारचे नाव लावू. त्यामुळे कुणीही पुलाच्या कामासंदर्भात आडकाठी आणू नये. कोणी खाजगी व्यक्तींनी पुलाच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असा इशारा विखेंनी दिला.

दरम्यान महापालिकेकडे भूसंपादनाचे 17 कोटी 64 लाख रुपये आले होते. त्यापैकी सहा कोटी रुपये हे भूसंपादनाच्या कामासाठी खर्च झाले आहते. त्यातील 11 कोटी रुपयाच्या रकमेतून संरक्षण खात्याला तीन कोटी 64 लाख तर भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाला उद्या तातडीने पैसे वर्ग करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भूसंपादनाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. उड्डाणपुलाच्या कामात पिण्याच्या पाण्याची लाईन तसेच अन्य बाबी अडचणी ठरू शकतात. ती अडचण सोडविण्याची जबाबदारी ही नगरसेवकांवर सोपविली असल्याचे विखे यांनी सांगितले. गुजरातमधील अग्रवाल बिल्डरला पुलाचा ठेका मिळाला असल्याचे विखे म्हणाले.

आमदार जगताप म्हणाले, अनेक वर्षापासून उड्डाणपूल हा नगरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला होता. उड्डाणपुलाचा प्रश्न हा केंद्र सरकारने मंजूर केला आहे. त्याची वर्क ऑर्डर देखील झाली आहे. आता काम कशा पद्धतीने पूर्णत्वास जाते यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उड्डाणपुलाच्या कामासाठी 10.34 हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील 8.88 जमीन ही शंभर टक्के स्तांतर झाली आहे. 0.47 हेक्टर पैकी बारा टक्के जमीन हे हस्तांतरित झाली आहे. महापालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे हे राहिलेल्या जमीन हस्तांतरणासाठी प्रयत्न करत आहे. पाथर्डी रोडच्या बायपासला देखील मंजुरी मिळाली आहे. नोव्हेंबरपर्यंत ते काम सुरू होईल. 40 किलोमीटरच्या या रोडच्या कामाची सुमारे 600 कोटी रुपये सिव्हिल कॉस्ट आहे. हे दोन प्रकल्प नगरच्या जनतेसाठी महत्त्वाचे आहे. हे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार असल्याचेही खासदार विखे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com