दीपक हॉस्पिटल मनपाच्या ताब्यात
सार्वमत

दीपक हॉस्पिटल मनपाच्या ताब्यात

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता महापालिकेने जुने दीपक हॉस्पिटल ताब्यात घेतले आहे. सिव्हीलमधील नर्सिगचे कोवीड सेंटरही महापालिका ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नगर शहरात रोज शंभराच्या पटीत करोनाची भर पडत आहे. काल मंगळवारी नगर शहरातील 270 नव्या बाधितांची भर पडली. बेडची संख्या आणि बाधितांचा आकडा ताळमेळ जुळत नसल्याने महापालिकेने आता खासगी हॉस्पिटल ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.

मनमाड रोडवरील जुने दीपक हॉस्पिटल महापालिकेने ताब्यात घेतले. तेथे 58 बेडची सुविधा आहे. याशिवाय सिव्हील हॉस्पिटलच्या नर्सिंग होस्टेलमध्ये उभारलेले कोवीड सेंटर ताब्यात मिळावे यासाठी महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे.

महापालिकेचे आनंद लॉन्समधील शंभर तर शासकीय तंत्रनिकेतमध्ये 120 खाटांचे कोवीड सेंटर फुल्लं झाली आहेत. नव्या बाधितांची बेड मिळण्यासाठी होणारी धावपळ यामुळे थांबेल असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com