नगरच्या टोळीवर मोक्का

नगरच्या टोळीवर मोक्का

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील (Nagar City) टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख आकाश भाऊसाहेब डाके (वय 25), गणेश भगवान कुर्‍हाडे (वय 23), सागर भाऊसाहेब डाके (वय 28), बाळासाहेब नाना वाघमारे (सर्व रा. बोल्हेगाव, अहमदनगर) व किरण सोमनाथ मातंग (वय 24 रा. हातगाव कांगणे, ता. शेवगाव) या आरोपींविरोधात मोक्का (Mokka) कायद्यांतर्गत कारवाई (Action) करण्यात आली आहे.

या टोळीविरोधात तोफखाना पोलीस स्टेशनच्या (Topkhana Police Station) निरीक्षक ज्योती गडकरी (PI Jyoti Gadkari) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मान्यता दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com