गुरूवारी नगर शहरात चारच करोना बाधित

गुरूवारी नगर शहरात चारच करोना बाधित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात गेल्या 24 तासांत 149 जणांना करोना संसर्गाचे निदान झाल्याचा आकडा गुरूवारी समोर आला. तथापि, वाढलेल्या या आकड्यामुळे नगरकरांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रत्यक्षात मात्र, नगर शहरात चार जणांनाच करोना संसर्गाचे निदान गेल्या 24 तासांत झाले आहे. उर्वरित 145 जण अगोदरच्या काळात मयत झालेले असून, त्याची गुरूवारी पोर्टलवर नोंद झाल्याची माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.

आयुक्त गोरे म्हणाले, करोनाबाधित रुग्ण खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाल्यास त्याची पूर्वी योग्य नोंद होत नव्हती. केंद्र व राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली. सरकारच्या आदेशानंतर आता ही नोंद होऊ लागली आहे. गुरूवारी पोर्टलवर नगर शहरातून पूर्वी करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या 145 जणांची नोंद झाली. त्यामुळे हा आकडा करोनाबाधितांच्या यादीत पोर्टलवर अपडेट झाला आणि वाढल्याचे दिसून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com