सर्वाधिक करोना अ‍ॅॅक्टिव्ह रुग्ण नगर शहरातच !
सार्वमत

सर्वाधिक करोना अ‍ॅॅक्टिव्ह रुग्ण नगर शहरातच !

मृत्यूची संख्या सर्वाधिक संगमनेरमध्ये 13 तर जिल्ह्यात एकूण 26

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात 12 मार्चला करोना पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्ण नगर शहरात आढळला होता. याला आता चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून या दरम्यान काटेकोर काळजी घेऊनही जिल्ह्यातील बाधितांच्या आकड्याने एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, दुसरीकडे सोमवारपर्यंत 666 रुग्णांनी करोनावर मात केली असून सध्या करोनाचे सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण हे नगर शहरात 158 आहेत. त्या खालोखाल संगमनेर 25 आणि राहाता 25 असे रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत एक हजार 305 व्यक्तींना करोनाची बाधा झालेली आहे. यात एकट्या नगर शहरात 409 रुग्ण समोर आले आहेत. संगमनेरमध्ये देखील 223 करोना रुग्ण सापडलेले आहेत. उर्वरीत तालुक्यांत हे प्रमाण 14 ते 70 रुग्ण असे आहे. जिल्ह्यात करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणेने चार महिने मोठे कष्ट घेतले. मात्र, परजिल्ह्यातील पुण्या-मुंबईच्या पाहुण्यांमुळे जिल्ह्यातील करोनाचा आलेख दिवसंदिवस वाढत गेला. अलीकडच्या आठवडाभरात नगर शहरात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत.

यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग काळजीत आहे. असेच प्रमाण राहिल्यास जिल्ह्यातील करोनाची स्थिती बिकट होणार आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत एक हजार 35 व्यक्तींना करोनाची बाधा झाली असून यात 26 रुग्णांचा मृत्यू झाला असून 666 रुग्ण करोनातून बाहेर आलेले आहेत. तर सध्या 343 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृत्यूमध्ये संगमनेर तालुका आघाडीवर असून या ठिकाणी सोमवारच्या आकडेवारीपर्यंत 13 रुग्णांचा, नगर शहरात 5 रुग्णांचा तर पारनेर, श्रीरामपूर प्रत्येकी दोन आणि राहाता, कोपरगाव अकोले आणि जामखेडमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नगर शहरात सापडलेले असून त्यांची संख्या 409, संगमनेर 223, राहाता 70, पारनेर 40, अकोले 38, श्रीरामपूर 36, श्रीगोंदा 34, नगर ग्रामीण 29, जामखेड 28, भिंगार 23, शेवागव 22, नेवासा 22, पाथर्डी 15, कोपरगाव 14, राहुरी 14, कर्जत 13, अन्य जिल्हा 4 आणि अन्य राज्य 1 अशी एक हजार 305 रुग्ण संख्या आहे.

नगर मनपा 158, संगमनेर 58, राहाता 25, पारनेर 11, अकोले 10, श्रीरामपूर 11 श्रीगोंदा 15, नगर ग्रामीण 6, जामखेड 4, भिंगार 14, शेवागव 7, नेवासा 14, पाथर्डी 3, कोपरगाव 1, राहुरी 4, कर्जत 1, अन्य जिल्हा 0 आणि अन्य राज्य 1 अशी 343 रुग्ण संख्या आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com