मंदिरे उघडण्यासाठी नगर शहर भाजपाचे आंदोलन

श्री विशाल गणेश मंदिरासमोर आरती, शंखनाद
मंदिरे उघडण्यासाठी नगर शहर भाजपाचे आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकाराने गेल्या दीड वर्षांपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्योग, व्यवसायांबरोबरच मंदिर उघडण्यावर बंदी घातली होती. परंतु करोनाचा प्रादूर्भाव कमी होत असताना जवळजवळ सर्वच क्षेत्रावरील निर्बंध उठवून सर्व व्यवहार सुरळीत केले. विशेषत: बार ही सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र मंदिरे बंद ठेवली आहेत. सरकार आपले अपशय झाकण्यासाठी मंदिर उघडण्याचा प्रश्न प्रलंबित ठेवत आहेत. मंदिरे लवकरात लवकर न उघडल्यास भाजपाच्यावतीने आणखी तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा भाजपाचे नगर शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिला.

शहर जिल्हा भाजपाच्यावतीने राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरासमोर आरती करण्यात आली. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष गंधे, ज्येष्ठ नेेते अ‍ॅड. अभय आगरकर, सुनील रामदासी, सरचिटणीस महेश नामदे, तुषार पोटे, उपाध्यक्ष शिवाजी दहिंडे, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, अंजली देवकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड. आगरकर म्हणाले, मंदिरे आपली प्रेरणा आणि शक्तीस्थाने आहेत. देवादिकांच्या आशिर्वादाने आपले जीवन सुख व समृद्ध होत असते. ही प्रेरणास्थाने बंद ठेवून सरकार भाविकांना एकप्रकारे वेठीस धरत आहे.

मंदिरातून करोना होतो व इतर ठिकाणाहून होत नाही का? राज्य सरकारचा हा निर्णय तुघलकी कारभार असून, त्यामुळे भावनांबरोबर मंदिरावर अवलंबून असणार्‍या अनेक घटकांवर हा अन्याय आहे. यावेळी सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, बाळासाहेब गायकवाड, महेश तवले, उमेश साठे, अमित गटणे, किशोर बोरा, ज्ञानेश्वर काळे, सुमित बटुळे, शशांक कुलकर्णी, वसंत राठोड, गणेश साठे, पंकज जहागिरदार, आशिष अनेचा, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, ऋग्वेद गंधे, हुजेफा शेख, बाळासाहेब खताडे, किशोर कटोरे, संदीप मुनोत आदी उपस्थित होते. यावेळी राज्य शासनाच्या मंदिर बंद ठेवण्याच्या भुमिकेचा आसूड मारून, शंखनाद, घंटानाद करून निषेध करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com