दुचाकी चोरी
दुचाकी चोरी
सार्वमत

नगर शहरातून दुचाकी चोरी करणाऱ्या एकास अटक

चोरीच्या सात दुचाकी हस्तगत

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

शहरातून दुचाक्यांची चोरी करणाऱ्या एकाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या आहे. मनोज गोरख मांजरे (वय- २१ मुळ रा. मातापूर ता. श्रीरामपूर, हल्ली रा. कल्याण रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मांजरे याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com