अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर-औरंगाबाद रस्त्यावर पोखर्डी गावाजवळ भरधाव वेगाणे जाणार्या खडीच्या डंपर खाली (एम.एच. 16 ए.वाय 6599) चिरडून 19 मेंढ्यांचा मृत्यु झाला आहे. तर आणखी 25 मेंढ्या जायबंदी झाल्याची घटना गुरूवारी दुपारी 4 च्या सुमारास घडली.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचा ताफा ताबडतोब घटनास्थळी पोहचल्यानंतर मृत आणि जायबंद मेंढ्यांच्या नोंद घेण्यात आहे. तत्पूर्वी ज्या डंपरखाली मेंढ्या चिरडल्या गेल्या त्या डंपरच्या चालकाचा डंपरवरील ताबा सुटुन डंपर रस्ता दुभाजकावर चढला सबंध रस्ताभर मेंढ्याच्या मांसाचा खच पडलेला होता. या घटनेमुळे नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.
त्यावेळी स्थानिक रहिवासी जगन्नाथ निमसे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वहातुक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलीसांना मदत केली. मेंढ्यांचे कळप हे पुरंदर तालुक्यातील रहिवासी असून ते मेंढ्यांच्या कळपासह नाशिकला मेंढ्या चरायला गेले होते. येतांना ते मनमाड-औरंगाबाद रस्त्याने नगर मार्गे पुण्याकडे चालले होते. मात्र, नगर औरंगाबाद रस्त्यावर त्यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. या अपघातामुळे या धनगर मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.