नेवासाफाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

अपघात | Accident
अपघात | Accident

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा फाटा (Newasa Phata) येथे अज्ञात वाहनाने पायी चाललेल्या तरुणास धडक दिल्याने त्याचा मृत्य झाल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उत्तम दिनकर इंगळे (वय 55) रा. नविन काळेगाव मुकिंदपूर शिवार ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की नेवासा फाटा (Newasa Phata) येथे नगर-औरंगाबाद रोडने (Nagar-Aurangabad Road) त्यांचा चुलत नातू सुमित सुनील इंगळे (वय 25) हा 24 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी पायी चालला असताना नगरहून औरंगाबादच्या दिशेने चाललेल्या अज्ञात आरोपीने त्याच्या ताब्यातील अज्ञात वाहन औरंगाबादच्या दिशेने हयगईने अविचाराने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष (Ignore) करून पायी चालणार्‍या फिर्यादीच्या चुलत नातूस धडक देऊन अपघात केल्याने तो गंभीर जखमी (Injured) होऊन तो जागीच मयत झाला.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 812/2021 भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 279 मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 प्रमाणे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com