दोन ट्रकच्या अपघातात वृध्देसह दोघांचा मृत्यू; एक जखमी

अपघात
अपघात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपुल (ता. नगर) शिवारात हॉटेल सिंहगड समोर कांद्याच्या गोण्या भरलेला ट्रक उभा असताना औरंगाबादकडे भरधाव वेगात चाललेल्या ट्रकने पाठीमागुन जोराची धडक दिल्याने वृध्द महिलेसह दोघांचा मृत्यू व एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी तीन वाजता झालेल्या अपघाताने ट्रकमधील कांद्याच्या गोण्या रस्त्यावर विखुरल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली होती.

अपघातात रस्त्याने पायी चाललेल्या घोडेगाव (ता. नेवासा) येथील जानकाबाई महादु पवार (वय 74) या ट्रक खाली सापडून तर ट्रक मधील रामा विजय गवई (रा. डोंगरकिन्ही, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांचा मृत्यू झाला आहे. चालक नितीन साळवे (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) हे गंभीर जखमी झाले आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मोहम्मद शेख व संदीप आव्हाड तातडीने घटनास्थळी धाव घेवून रस्त्यावरील वाहने बाजुला घेवुन वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com