
सोनई |वार्ताहर| Sonai
10 जून रोजी रात्री नगर-औरंगाबाद महामार्गावरील (Nagar-Aurangabad Highway) घोडेगाव शिवारात (Ghodegav) जालन्याहून (Jalna) पुण्याकडे (Pune) जात असलेला ट्रक लुटल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना सोनई पोलिसांना (Sonai Police) पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मुद्देमालासह अटक (Arrested) करण्यात यश आले आहे.
सोनई पोलीस ठाणे (Sonai Police Station) हददीत दिनांक 10 जुन रोजी रात्री जालना (Jalna) येथुन 21 टन 850 किलो वजनाच्या लोखंडी सळ्या भरुन घेवून जाणारा ट्रक (एमएच 12 केपी 3295) हा औरंगाबद ते अहमदनगर रोडने (Nagar-Aurangabad Highway) पुण्याकडे जाण्यासाठी निघाला असताना घोडेगाव (Ghodegav) शिवारात दोन मोटर सायकलवरुन आलेल्या चोरटयांनी ट्रक ड्रायव्हरला चाकुचा धाक दाखवुन ट्रक व ट्रक चालकास ताब्यात घेवुन त्यास बळजबरीने घेवुन जावुन ट्रक मधील सुमारे 5 लाख 61 हजार रुपये किमतीच्या सळया व मोबाईल चोरुन घेवून सदरचा ट्रक हा खोसपुरी ता. पाथर्डी शिवारात रोडचे कडेला सोडून निघुन गेले होते. सदर ट्रक चालकाचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस स्टेशनला 191/2022 भादवि कलम 392, 363, 349,34,412 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व पोलीस पथक यांनी सोनई पोलीस ठाण्याच्या परिसरात तसेच पाथर्डी तालुक्यात शोध घेतला असता सुजित राजेंद्र चौधर (वय 22) वर्ष, रा.निपाणी जळगाव ता.पाथर्डी, संकेत बद्रीनाथ बड़े (वय 20) मुळ रा. जेऊरहैबती ता. नेवासा हली रा. आगासखांड ता. पाथर्डी, रोहन संजय चव्हाण (वय 21) रा. शिक्षक कॉलनी पाथर्डी, दतात्रय गोरक्ष साळुंके (वय 33) रा. निवडुंगे ता. पाथर्डी तसेच हे स्टील विकत घेतले म्हणून आरोपींनी नाव सांगितलेला शंकर आसाराम घोडके (वय 42) रा. निवडुंगे ता. पाथर्डी यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील 4 लाख 80 हजार 200 रुपये किंमतीचे 6860 कि.ग्रॅ. वजनाचे स्टील हे हस्तगत केले आहे.
आरोपींनी सोनई पोलीस ठाणे हददीत केलेल्या दोन गुन्हयाची कबुली दिली आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक उमेश पतंगे, सहायक फौजदार संजय चव्हाण, हवालदार मच्छिंद्र आडकित्ते, हवालदार दत्ता गावडे, पोलीस नाईक फुरकान शेख (सायबर सेल अपर पोलीस अधिक्षक कार्या श्रीरामपूर), पो. ना. बाबा वाघमोडे, पोलीस नाईक बाळासाहेब बाचकर, पोलीस नाईक नानासाहेब तुपे, कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात, कॉन्स्टेबल सचिन ठोंबरे, कॉन्स्टेबल रवि गर्जे, कॉन्स्टेबल अमोल जवरे यांनी ही कामगिरी केली.