
अहमदनगर|Ahmedagar
पाईपलाईन रोडवरील संकल्प अपार्टमेंटच्य ग्राउंड फ्लोअरला असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
आज पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चोरटे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून आले होते. एटीएम सेंटरमधून पैसे असलेले मशीन हे सेंटर मधून बाहेर काढून घेऊन जात असताना अपार्टमेंटमधील लोक जागे झाल्याने चोरट्यांनी तिथून पळ काढला. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तत्काल घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.