नगर-आष्टी रेल्वे आजपासून धावणार

नगर-आष्टी रेल्वे आजपासून धावणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या बीडमधील आष्टी ते अहमदनगर या 66 किमीच्या रेल्वे मार्गावर उद्घाटनानंतर नियमित रेल्वे चालवण्यात येणार आहे. रेल्वेकडून आता यासंदर्भात वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

रेल्वेकडून 24 सप्टेंबरपासून चालवल्या जाणार्‍या रेल्वेसेवेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. रविवार वगळता आठवड्यातील सहा दिवस नगर-आष्टी आणि आष्टी-नगर या मार्गावर ही रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन नगरहून निघाल्यानंतर नारायणडोह, नवीन लोणी, सोलापूरवाडी, नवीन धानोरा, कडा या स्थानकांवर ट्रेनला थांबा देण्यात आला आहे.

पुढील सूचनेपर्यंत रेल्वेचा वेग हा मर्यादितच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. नगरहून पहिली ट्रेन दररोज सकाळी 7.45 ला सुटणार आहे. ही ट्रेन आष्टीत 10.30 वाजता पोहोचेल. आष्टीहून स. 11 वाजता ट्रेन सुटेल, तर नगरमध्ये ही ट्रेन दुपारी 1.55 वाजता पोहोचेल, असे रेल्वे वेळापत्रकात म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवीन आष्टी - अहमदनगर रेल्वे मार्गाचे उद्घाटन करतील आणि नवीन आष्टी-अहमदनगर डेमू सेवेच्या उद्घाटनाच्या सेवेला आज 23 सप्टेंबरला हिरवा झेंडा दाखवतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com