नगर : जिल्हयात नव्या ६८ रुग्णांची भर
सार्वमत

नगर : जिल्हयात नव्या ६८ रुग्णांची भर

जिल्ह्यातील एकूण बधितांची संख्या १०,६९४ वर

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हयात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६८ ने वाढ झाली आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २८३५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये ६८ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण १४, श्रीरामपुर ०१, कँटोन्मेंट ०७, नेवासा १२, पारनेर ०१, शेवगाव ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ४७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १८५, संगमनेर २२, राहाता १४, पाथर्डी ३०, नगर ग्रा.२६, श्रीरामपूर ३७ , कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २२, श्रीगोंदा १५, पारनेर १८, अकोले ०६, राहुरी ०४, शेवगाव २५, कोपरगाव ३७, जामखेड ०३, कर्जत १७ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com