दहावीत मुलीच हुश्शार !; नगर जिल्ह्याचा 96.10 टक्के निकाल

पुणे विभागात पुन्हा तिसर्‍या स्थानावर
दहावीत मुलीच हुश्शार !; नगर जिल्ह्याचा 96.10 टक्के निकाल
दहावीत मुलीच हुश्शार !; नगर जिल्ह्याचा 96.10 टक्के निकाल
दहावीतही मुलींची बाजी; यंदा ९५.३० टक्के लागला निकाल

संगमनेर|वार्ताहर|Sangmner

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा नगर जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के लागला आहे. पुणे विभागातील तो सर्वात कमी निकाल आहे. जिल्ह्यातील 38 हजार 940 मुले तर 30 हजार 500 मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

यात 36 हजार 753 मुले व 19 हजार 607 मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांची पास होण्याची टक्केवारी 94.3 टक्के तर मुलींची 97.64 टक्के आहे. यामुळे बारावीच्या निकालाप्रमाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलीचं हुश्शार असल्याचे समोर आले आहे.

माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला नगर जिल्ह्यातील 1 हजार 7 माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षेचा शेकडा निकाल 76.31 टक्के लागला आहे. पुनर्परीक्षार्थीपैकी 14 विद्यार्थी उच्च श्रेणीत, 116 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 234 विद्यार्थी व्दितीय श्रेणी तर चक्क 4499 विद्यार्थी पास झाले आहेत. जिल्ह्यातील 75 हजार 244 नियमित विद्यार्थी, 645 खाजगी, बारा स्वतंत्रपणे, एक विद्यार्थी सीआयएस असे अर्ज सादर करण्यात आले होते.

मागील वर्षीपेक्षा यंदाचा निकाल 16 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षीचा निकाल 79.50 टक्के होता. यंदा त्यात वाढ होऊन तो 96.10 टक्क्यांवर पोहचला आहे. मागील वर्षी पारनेरचा निकाल सर्वाधिक 84 टक्के, तर सर्वात कमी निकाल नेवासे तालुक्याचा (70.84 टक्के) होता. यंदा नगर शहर आणि तालुक्याचा सर्वाधिक 97. 88 तर सर्वात कमी श्रीरामपूर तालुक्याचा 92. 67 लागला आहे. यंदा या 11 तालुक्यांचा निकाल 95 टक्क्यांच्या पुढे आहे. तर एक हजार 7 शाळांपैकी 341 शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.

नेवाशाच्या शिक्षक कन्येला 100 टक्के गुण

नगरमधील रेसिडेन्शिल हायस्कूलची विद्यार्थिनी श्रध्दा एकनाथ लगड या मुलीला दहावीच्या परिक्षेत शंभर टक्के गुण मिळाले आहेत. श्रध्दाचे वडील नेवासा तालुक्यात माध्यमिक शिक्षक आहेत. कोणतीही खासगी शिकवणीशिवाय तिन्हे हे यश संपादन केले आहे.

नेवासा तालुक्याचा दहावीचा निकाल 94.23 टक्के

नेवासा|का. प्रतिनिधी|Newasa

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा ऑनलाईन निकाल काल बुधवारी जाहीर झाला असून यात नेवासा तालुक्याचा निकाल 94.23 टक्के इतका लागला असून तो मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 23.19 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्यावर्षी तो 71.04 टक्के इतका होता. सलग तीन वर्षे निकालात मोठी घट झाल्यानंतर यावर्षी निकालाने मोठी झेप घेतली आहे.

तालुक्यातील 71 शाळांतून एकूण 5824 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. पैकी 5795 परीक्षेस प्रविष्ठ झाले. त्यापैकी 5461 विद्यार्थी उत्तीर्ण होवून निकाल 94.23 टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 1909 विद्यार्थी विशेष प्राविण्यात (डिस्टींक्शन) उत्तीर्ण झाले. 2228 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली. 1141 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर 183 विद्यार्थी उत्तीर्ण (तृतीय) श्रेणीत उत्तीर्ण झाले.

नेवाशातील आदर्श विद्यामंदीर या शाळेचा सर्वात कमी 44.44 टक्के इतका निकाल लागला. या शाळेतील 27 पैकी केवळ 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

100 टक्के निकाल लागलेल्या 14 शाळा- मुळा पब्लिक स्कूल (सोनई), न्यू इंग्लिशस्कूल (सुरेगाव), कै. घाडगेपाटील माध्यमिक विद्यालय (तेलकुडगाव), राजे संभाजी माध्यमिक विद्यालय (कौठा), अल अमीन ऊर्दू शाळा (नेवासा), स्वामी विवेकानंद विद्यालय (मोरेचिंचोरे), सेंट मेरीज स्कूल (नेवासा), पाथरवाला माध्यमिक विद्यालय (पाथरवाला), शहालीबाबा माध्यमिक विद्यालय (पिंप्री शहाली), जिजामाता पब्लिक स्कूल (भेंडा), ज्ञानमाऊली इंग्लिश मिडीयम स्कूल (घोडेगाव), सेव्हन्थ डे स्कूल (नेवासा), गुरुकूल इंग्लिश मेडीयम स्कूल व ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल या 14 शाळांचा समावेश आहे.

मुलींची आघाडी- तालुक्यातील 3328 मुले व 2467 मुली असे एकूण 5795 परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 3067 मुली व 2394 मुले असे एकूण 5461 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.16 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 97.04 टक्के इतके आहे.

राहाता : दहावीचा निकाल 96 टक्के निकाल

17 शाळांचा 100 टक्के तर योगिराज चांगदेव महाराज विद्यालयाचा सर्वात कमी निकाल

शिर्डी|प्रतिनिधी|Shirdi

मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेत राहाता तालुक्यातून 5204 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 4997 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यावर्षी तालुक्याचा दहावीचा निकाल 96.02 टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील 17 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून सर्वात कमी निकाल पुणतांबा येथील योगिराज चांगदेव महाराज विद्यालयाचा 58.33 टक्के लागला आहे. यावर्षीही दहावीच्या परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.

मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेत तालुक्यातून 5259 विद्यार्थी परिक्षेसाठी पात्र ठरले होते. यापैकी 5204 विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यापैकी 4997 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 1850 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळविले असून 1821 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 1045 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

281 विद्यार्थी श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ज्या शाळांचा 100 टक्के निकाल लागला त्या तालुक्यातील शाळांमध्ये भगवतीपूर येथील भगवतीमाता विद्यामंदिर, निमगाव कोर्‍हाळे येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय, लोणी खुर्द येथील पद्मश्री डॉ. विखे पा. सैनिक विद्यालय, चोळकेवाडी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय, रुई येथील श्रीमती एम. ए. देशमुख माध्यमिक विद्यालय, राहाता येथील साध्वी प्रिती सुधाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, शिर्डी येथील आदर्श माध्यमिक विद्यालय, शिर्डी येथील श्रीसाईबाबा इंग्लिश मिडिजम स्कूल, प्रवरानगर महात्मा गांधी विद्यालय, प्रवरानगर येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर, लोणी येथील प्रवरा गर्ल इंग्लिश मिडीयम स्कूल, भगवतीपूर येथील प्रवरा हायस्कूल, डहाणूकर इंग्लिश मिडियम स्कूल, आडगव बुद्रुक येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय,

वाकडी येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, श्री गणेश इंटर स्कूल, साकुरी येथील द्रोणा अकॅडमी या शाळांचा समावेश आहे. तर 99 टक्के लागलेल्या तीन शाळा आहेत. यात अस्तगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल (99.11), राहाता येथील संत जॉन इंग्लिश मिडियम स्कूल (99.25), चिखली येथील न्यू इंग्लिश स्कूल (99.37) यांचा समावेश आहे. सर्वात कमी निकाल पुणतांबा येथील योगीराज चांगदेव महाराज विद्यालयाचा 58.33 टक्के निकाल लागला आहे.

श्रीरामपूर तालुक्याचा दहावीचा निकाल 92.67 टक्के निकाल

13 शाळांचा 100 टक्के तर सर्वात कमी निकाल बेलापूर सौमय्या विद्यालयाचा

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेत श्रीरामपूर तालुक्यातून 4463 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 4136 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यावर्षी तालुक्याचा दहावीचा निकाल 92.67 टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील 13 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून सर्वात कमी निकाल बेलापूर येथील जे.टी. एस. विद्यालयाचा 79.01 टक्के लागला आहे. यावर्षीही दहावीच्या परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.

मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेत तालुक्यातून 4492 विद्यार्थी परिक्षेसाठी पात्र ठरले होते. यापैकी 4463 विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यापैकी 4136 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 1402 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळविले असून 1426 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 1013 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 295 विद्यार्थी श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

ज्या शाळांचा 100 टक्के निकाल लागला त्या तालुक्यातील शाळांमध्ये मालुंजे येथील श्री एकनाथ केशव औटी विद्यालय, खंडाळा येथील न्यू इंग्लिश स्कूल, श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल, निपाणीवडगाव येथील रामराव आदिक पब्लिक स्कूल, खोकर येथील गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय, गळनिंब येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय, माळवाडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल, श्रीरामपूर येथील मॉडेल इंग्लिश स्कूल, शिरसगाव येथील डि पॉल इंग्लिश स्कूल, भोकर येथील दिव्या दयाचंद इंग्लिश स्कूल, विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल,

गुड शेफर्ड स्कूल, अशोक इंग्लिश मिडियम स्कूल अशा 13 शाळांचा समावेश आहे. तर 99.38 टक्के श्रीरामपूर येथील सेंट झेवियर स्कूलचा लागला आहे. या शाळेतील 163 पैकी 162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यात सर्वात कमी निकाल असलेल्या शाळेत बेलापूर येथील जेठाभाई टी. सोमय्या हायस्कूल या शाळेचा 79.01 टक्के निकाल लागला आहे.

अहमदनगर शहर व तालुक्याचा सर्वाधिक 97.88 टक्के निकाल

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

दहावीच्या परीक्षेत यंदा जिल्ह्यात नगर तालुक्याचा (शहरासह) सर्वाधिक 97.88 टक्के निकाल लागला. श्रीरामपूर तालुका (92.67 टक्के) सर्वात खालच्या स्थानावर राहिला. 12 तालुक्यांचा निकाल 95 टक्क्यांच्या पुढे आहे. जिल्ह्याचा निकाल यंदा बारावीप्रमाणे दहावीमधील मुलींनी बाजी मारली. दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्य मंडळातर्फे विद्यार्थांचा निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट ऑफ फाईव्ह) पद्धतीने जाहीर करण्यात आला.

बुधवारी दुपारी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के लागला. मागील वर्षीपेक्षा यंदाचा निकाल 16 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षीचा निकाल 79.50 टक्के होता. यंदा तो 96.10 टक्क्यापर्यंत वाढला आहे. मागील वर्षी पारनेरचा निकाल सर्वाधिक 84 टक्के, तर सर्वात कमी निकाल नेवासा तालुक्याचा (70.84 टक्के) होता. यंदा नगर शहर आणि तालुक्याचा निकाला 97.88 टक्के लागला आहे. तर अकोले, जामखेड, कर्जत, कोपरगाव, नगर, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, श्रीगोंदा या 11 तालुक्यांचा निकाल 95 टक्क्यांच्या पुढे लागला. सर्वात कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा 92.67 टक्के लागला आहे.

अकोले 98 शाळा 4447 पास आणि 95.84 टक्के, जामखेड 33 शाळा 2276 पास आणि 96.36 टक्के, कर्जत 55 शाळा 3357 पास 96.41 टक्के, कोपरगाव 48 शाळा 4721 पास आणि 96.03 टक्के, नगर 142 शाळा 9649 पास आणि 97.88 टक्के, नेवासा 71 शाळा 5461 पास आणि 94.24 टक्के, पारनेर 77 शाळा 3644 पास आणि 97.30 टक्के, पाथर्डी 69 शाळा 4322 पास आणि 95.98 टक्के, राहाता 60 शाळा 4997 पास आणि 96.02 टक्के, राहुरी 59 शाळा 4070 पास आणि 95.47 टक्के, संगमनेर 115 शाळा 7118 पास आणि 97 टक्के, शेवगाव 46 शाळा 3970 पास आणि 94.61 टक्के, श्रीगोंदा 75 शाळा 4142 पास आणि 97.78 टक्के, श्रीरामपूर 59 शाळा 4136 पास आणि 92.67 टक्के निकाल असा एकूण 1 हजार 7 शाळा 66 हजार 360विद्यार्थी पास आणि 96.10 टक्के निकाल लागला आहे.

जिल्ह्यात यंदा पुनर्परीक्षांर्थींचा (रिपिटर) निकाल 76.31 टक्के लागला. जिल्ह्यातील 6 हजार 373 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 14 जण विशेष श्रेणीत, 116 जण प्रथम श्रेणीत, 234जण द्वितीय श्रेणीत, तर 4 हजार 863 विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण श्रेणीत समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com