नागापुरात चोरट्यांचा धुमाकूळ

चार ठिकाणी घरफोडी, पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास
नागापुरात चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागापूर (Nagapur) उपनगरातील पितळे कॉलनीत (Pitale Colony) मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी (thieves) चांगलाच धुमाकूळ घातला. एकाचवेळी दोन घरे, किराणा दुकान व मेडिकल फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा एकूण दोन लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गोरक्ष दादाराम गारूडकर (रा. नागापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी (Thieves) मध्यरात्री गारूडकर यांच्या घरातून पैसे, सोन्याचे दागिने चोरले. त्यानंतर घराजवळ असलेले किराणा दुकान फोडून एकूण दोन 27 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरला. याचवेळी पितळे कॉलनी (Pitale Colony) येथे राहणारे नामदेव शंकर कांडके यांच्या घरातून चोरट्यांनी लॅपटॉप, सोन साखळी असा 35 हजारांचा मुद्देमाल चोरला.

त्यानंतर येथील सिनारे हॉस्पिटलमधील मेडिकल फोडून तेथून रोख तीन हजार रूपये चोरून नेले. एकाचवेळी चार ठिकाणी घरफोडी झाल्याने परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com