कंपनीतील कामगारच निघाले चोर; 10 लाखांची तार चोरली

कंपनीतील कामगारच निघाले चोर; 10 लाखांची तार चोरली

नागापूर एमआयडीसीतील प्रकार; आठ जणांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर | Ahmedagar

कंपनीत काम करणार्‍या आठ कामगारांनी संगणमताने 10 लाख 40 हजार रूपये किंमतीची तांब्याची तार चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नागापूर एमआयडीसीतील सीजी पॉवर एम थ्री कंपनीमध्ये ही चोरीची घटना घडली. या प्रकरणी आठ जणांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सात कामगारांना अटक केली आहे. रमजान महेबुब शेख (वय 47 रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, नगर) यांनी आज फिर्याद दिली आहे.

Title Name
चोरांची नजर आता गाढवांवर!
कंपनीतील कामगारच निघाले चोर; 10 लाखांची तार चोरली

गुन्हा दाखल झाल्यामध्ये उमेश सुधाकर होनकर (वय 42 रा. वंजारगल्ली, नगर), दत्ता काळे, कोंडीभाऊ शेळके, अक्षय शिंदे (सर्व रा. निंबळक ता. नगर), संतोष पवार, भाऊसाहेब शिंदे (रा. हिंगणगाव ता. नगर), संजू वैद्य (रा. बोल्हेगाव फाटा), अक्षय साबळे (रा. निंबळक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी यांची नागापूर एमआयडीसीत सीजी पॉवर एम थ्री नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये आरोपी कामगार म्हणून काम करत होते. सुपरवायझर, वॉचमन, कामगार म्हणून हे सर्व जण कामाला होते. यांनी संगनमत करून कंपनीतील तांब्याच्या तारीचे 13 बंडल चोरून नेले. याची किंमत 10 लाख 40 हजार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Title Name
चिंता वाढली! जिल्ह्यात आजही ३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
कंपनीतील कामगारच निघाले चोर; 10 लाखांची तार चोरली

घटनास्थळी नगर ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी भेट दिली. कंपनीतील अजून कोणी यात सहभागी आहे का? याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती सहायक निरीक्षक आठरे यांनी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com