कंपनीतून शिसे चोरी करताना दोघांना पकडले

40 हजार रुपये किंमत : एमआयडी पोलिसांची कारवाई
कंपनीतून शिसे चोरी करताना दोघांना पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागापूर एमआयडीसीमधील एक्साईड लि. कंपनीमधून लीड (शिसे) ची चोरी करणार्‍या दोघांना पकडण्यात आले आहे. अजित चंद्रभान शिंदे आणि आकाश जयसिंग आगळे अशी पकडलेल्या दोघांची नावे असून त्यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात संतोष पद्माकर डबीर (वय 49 रा. पाईपलाईन रोड, नगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरूवार सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अजित शिंदे आणि आकाश आगळे हे दोघे वाहन (एमएच 16 क्यु 272) घेऊन एक्साईड कंपनीमध्ये बॉक्स बॅटरी व प्लेट नेण्यासाठी आले. शिंदे आणि आगळे बॉक्स बॅटरी व प्लेट वाहनात भरत असताना एक्साईड कंपनीचे सिक्युरिटी रवींद्र इंगळे यांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये लीड (शिसे) याचे नऊ बंडल आढळून आले.

त्याबाबत इंगळे यांनी त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी काही उत्तर दिले नाही. त्यानंतर इंगळे यांनी हा प्रकार प्लँट हेड संतोष डबीर यांना कळविला. त्यानंतर तपासणी केली असता शिंदे आणि आगळे यांनी 40 हजार रुपयांचे लिडचे नऊ बंडलची चोरी केल्याचे निर्दशनास आले. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com