नागापुर एमआयडीसीतील 'या' कंपनीमुळे वाचले 25 रूग्णांचे प्राण

नागापुर एमआयडीसीतील 'या' कंपनीमुळे वाचले 25 रूग्णांचे प्राण
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागापूर एमआयडीसीतील आर. डी. इंजिनिअरींग कंपनीचे आर. डी. पठाण यांनी दानशूरपणा दाखवत त्यांच्याकडील 10 ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा ‘न्यू लाईफ’ या कोव्हिड सेंटरला केला. यामुळे कोव्हिड सेंटरमधील ऑक्सिजनवर असलेल्या 25 रुग्णांचे प्राण वाचले.

पठाण यांची नागापूर एमआयडीसीत आर. डी. इंजिनिअरींग ही कंपनी आहे. ते रेल्वे ब्रिजची कामे या कंपनीतून करतात. यासाठी त्यांना ऑक्सिजनची गरज असते. सध्या नगरमधील अनेक रुग्णालयांत करोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची ऑक्सिजन मिळविण्यासाठी धडपड चालली आहे. डॉ. सुमित नलावडे यांच्या कोव्हिड सेंटरमधील ऑक्सिजन संपल्याने 25 रुग्णांचे प्राण धोक्यात असल्याची माहिती पठाण यांना त्यांच्या मित्रांनी सांगितली.

माहिती मिळताच त्यांनी कोणताही विचार न करता तत्काळ डॉ. नलावडे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कंपनीतील 10 सिलेंडरचा पुरवठा डॉ. नलावडे यांच्या कोव्हिड सेंटरला केला. पठाण यांनी दानशूरपणातून केलेल्या या कामाचे कौतूक होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com