सांबर सापडले मृतावस्थेत; निंबळकची घटना

सांबर सापडले मृतावस्थेत; निंबळकची घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरच्या नागापूर एमआयडीसीपाठीमागील (Nagapur MIDC) निंबळक (Nimblak) परिसरात एक सांबर मृतावस्थेत (Sambar is Dead) आढळून आले. ते धावत असताना त्याच्यामागे कुत्रे (Dog) लागले असल्याचेही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, वनपाल अशोक शर्माळे व पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत सांबराच्या शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे (Death) नेमके कारण स्पष्ट होईल, असे वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांनी सांगितले.

मृतावस्थेत सापडलेले पूर्ण वाढ झालेले नर सांबर असून निंबळक (Nimblak) परिसरातील स्नेहालय संस्थेच्या जीकेएन प्रकल्पाजवळ ते पडलेले होते. तेथे असलेले मिरेन गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिकांना ते दिसल्यावर त्यांनी निसर्गमित्र मंदार साबळे यांना कळवले. साबळे यांनी याबाबत उपवनसंरक्षक सुवर्णा माने व प्रभारी सहायक वन संरक्षक राठोड यांना माहिती दिली. त्यांनी लगेच पथक पाठवून मृतावस्थेतील सांबर शवविच्छेदनासाठी नेले.

नगर शहर (Ahmednagar City) व परिसरात काळवीट व चिंकारा (Blackbuck and Chinkara) हे आढळतात. सांबर (Sambar) फक्त भंडारदरा (Bhandardara) परिसरात काही प्रमाणात आढळतात. नगर शहराच्या जवळपास कुठेही त्याचा अधिवास नाही. हा घनदाट जंगलात राहणारा प्राणी असून नगर परिसरात हे आढळून आल्याची ही दुसरी घटना असल्याचे साबळे यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी तारकपूर बस स्थानकासमोर (Tarakpur Bus Stand) सांबर आढळले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com