
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
मटन-चिकन खरेदीच्या कारणावरुन दोन कुटूंबात हाणामारी झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील लाखेफळ-माळीचिंचोरा येथे घडली असून याबाबत दाखल परस्परविरोधी फिर्यादींवरुन दोन्ही बाजूच्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजू अब्बास सय्यद (वय 50) धंदा-मजुरी रा. लाखेफळ ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 17 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता आमचेकडून मटन-चिकन का घेत नाही? या कारणावरुन इसाक रमजान सय्यद याने कुर्हाडीच्या दांड्याने माझे डाव्या पायाच्या गुडघ्यावर मारुन कुर्हाडीच्या तुंब्याने डोक्यात मारहाण करुन इसाक रमजान सय्यद, रमजान सय्यद व अरिफा इसाक सय्यद या तिघांनी पत्नी रुबीना हीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली. या फिर्यादीवरुन वरील तिघांवर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 1161/2022 भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद अरिफा इसाक सय्यद (वय 3) रा. माळीचिंचोरा लाखेफळ वस्ती यांनी दिली असून त्यात म्हटले की, 17 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास माळीचिंचोरा लाखेफळ वस्ती येथे मी व माझे पती राजू सय्यद यांचे राहते घरासमोर आमचे मटनाची उधारी मागण्यासाठी गेले असता राजू अब्बास सय्यद, बब्बू राजू सय्यद, हमसेरा अब्बास सय्यद व रुबिना राजू सय्यद सर्व रा. माळीचिंचोरा यांनी संगनमत करुन राजू सय्ययद याने त्याच्या हातातील लाकडी काठीने माझे डावे हाताचे कांबीवर मारुन जखमी केले.
तसेच मला व माझे पती यांना लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 1162/2022 भारतीय दंड विधान कलम 324, 323, 04, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.