मुठेवाडगाव ग्रामपंचायतीस राज्यस्तरीय पं. दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार प्रदान

मुठेवाडगाव ग्रामपंचायतीस राज्यस्तरीय पं. दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार प्रदान

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

अहमदनगर जिल्हापरिषदेत पंचायतराज दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या राज्यस्तरीय पंडीत दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव ग्रामपंचायतीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला.

केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने नुकताच जाहीर केलेला राज्य पाळीवरील पंडीत दीनदयाळ उपाध्याय राज्यस्तरीय सशक्तीकरण पुरस्कार मुठेवाडगाव ग्रामपंचायतीला जाहीर करण्यात आला होता. पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीत होणार होता. करोना प्रादुर्भावामुळे सोहळा राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यांत घेण्यात आला. पंचायतराज दिनानिमित्त जिल्हा परिषद नगर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांच्याहस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप हे लोकसंख्येनुसार 5 लाख ते 15 लाख रुपये व सन्मानपत्र असे आहे. सदर पुरस्कार सरपंच सागर मुठे, उपसरपंच निर्मला पचपिंड, ग्रामसेवक सुधीर उंडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी उपस्थित राहून स्विकारला.

हा पुरस्कार मिळविण्यामागे ग्रामपंचायतीचा स्वच्छ कारभार, जलयुक्त शिवार कामास प्राधान्य, मोठी मेहनत घेत पुरस्कारांच्या रांगेत आणून ठेवणार्‍या सर्व माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ तरूण मंडळे, संत तुळशीदास महाराज देवस्थान ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य असल्याची प्रतिक्रिया सरपंच सागर मुठे यांनी व्यक्त केली.

अहमदनगर येथील पुरस्कार सोहळ्यास माजी सरपंच व बाजार समिती संचालक विश्वनाथ मुठे, माजी सरपंच शिवाजी मुठे, भाऊसाहेब जयवंत मुठे, जालिंदर मुठे, सुभाष मुठे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी सुधीर उंडे, प्रा. रंगनाथ कोळसे, भास्करराव मुठे, शिवाजी पवार, पोलीस पाटील दत्तात्रय मुठे, मारूती मुठे, रविन्द्र मुठे, ज्ञानदेव मल्हारी मुठे, दिनकर मुठे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.