माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्याकडुन भाईचाराची शिकवण - विवेक कोल्हे

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्याकडुन 
भाईचाराची शिकवण - विवेक कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने एकता, अखंडता, भाईचाराची शिकवण देत सर्व समाजाच्या उन्नतीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले असुन त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवुन भाईचाराची शिकवण अधिकाधिक बळकट करू, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

जुनी मामलेदार कचेरी पांडेगल्ली परिसरात रमजाननिमीत्त मुस्लीम बांधवासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी मुस्लीम समाजासाठी केलेल्या विकास कामांची माहिती दिली. विवेक कोल्हे म्हणाले, कुरआन शरीफ नुसार इस्लामी शरीयत कायदा तयार झाला असून त्यानुसार मुस्लीम बांधव आचरण ठेवत असतात. रमजान रोजा उपवासात एक वेगळी ताकद असून प्रत्येक जाती धर्मातील व्यक्ती आपल्या रूढी परंपरेनुसार आचरण ठेवत असतात.

याप्रसंगी कैलास जाधव, अतुल काले, भरत मोरे, असलम शेख, बबलु वाणी, दत्ता काले, खालीकभाई कुरेशी, सनी वाघ, स्वप्नील निखाडे, विवेक सोनवणे, पप्पु पडीयार, अनिल जाधव, विनोद राक्षे, संदीप देवकर, अहमदभाई बेकरीवाले, रंजन जाधव, जनार्दन कदम, रविंद्र कथले विक्रमादित्य सातभाई, फकीर महमद पहिलवान, अकील सय्यद, मुजाहिदभाई सययद, मकसुद अत्तार, बबलु अत्तार, शकील अत्तार, जितेंद्र रणशुर, कुणाल लोणारी, रविंद्र रोहमारे, गोपिनाथ सोनवणे, बाजीराव निकम, नरेंद्र लकारे, देवराम पगारे, बंटी पांडे, अंकुश जोशी, किरण सुपेकर, चंद्रकांत वाघमारे, सुशांत खैरे, छोटुभाई पठाण, आयूब पठाण, सलीम अत्तार अब्बास मनियार, शौकत शेख, अमन मनियार, निखील जोशी, अशीश निकुंभ, अरूण शेख, मुन्ना मन्सुरी, विष्णुपंत गायकवाड, दत्ता कोळस्कर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.